सहकार
…या सहकारी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५/२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे व त्यांच्या धर्मपत्नी गौरी शिंदे यांच्या शुभहस्ते पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.

कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात येऊन पूर्ण क्षमतेने नव्या युनिटवर यशस्वी गाळप हंगाम घेतले जात आहे.कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आल्यामुळे गाळप क्षमता देखील वाढली आहे.गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून कारखान्याच्या या ७१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे. या कार्यक्रमास सर्व सभासदांनी व कारखान्यावर प्रेम करणा-या हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी शेवटी केले आहे.