सहकार
‘काटामार’नेत्यांची चौकशी कराच-…या नेत्याचा घरचा आहेर

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात नुकताच उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची घोषणा केली असून ती अत्यंत चांगली केली असून त्यांचे शेतकरी व आम्ही अभिनंदन करतो असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबा डमाळे पाटील यांनी केले असून शेतकऱ्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

“उत्तर नगर जिल्ह्यातील ऊस कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसातून प्रती टणाची कपात करून उपपदार्थाची निर्मिती होते मात्र त्या उपक्रमातून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही हिस्सा मिळत नाही.त्यांनी प्रत्येक उपपदार्थ निर्मिती उद्घाटनाच्या वेळी केलेल्या घोषणा केवळ शब्दांचा बुडबुडा ठरलेला आहे.या उलट साखर सम्राट आपली घरे मात्र भरून घेताना दिसत आहे.कोळपेवाडी व संजीवनी म्हणजेच काळे व कोल्हे यांच्या कारखान्यापासून काटा मारण्याची चौकशी करावी’- बाबा डमाळे,उपाध्यक्ष,भाजप किसान मोर्चा.
डमाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी आहे की,”आपण अहिल्यानगर जिल्ह्यात केलेली घोषणा ज्या ठिकाणी केली त्याची सुरुवात कोपरगावच्या कारखान्यापासून सुरुवात करावी कोपरगाव तालुक्यातील संजीवनी कोल्हे,कोळपेवाडी काळे यांच्यापासून काट्यांच्या चाचण्यांची सुरुवात करावी तरच आपली घोषणा खरी ठरेल अन्यथा घोषणेवर शेतकऱ्यांमध्ये हसू होऊ नये असा इशारा दिला आहे.
आपण ज्या उपऱ्या व बाहेरून सर्व पक्ष फिरून आलेल्या साखर कारखानदार सम्राटांची चोचले पुरवतात शेतकऱ्यांचा असणारा कारखाना स्वतःची प्रायव्हेट कंपनी असल्यासारखी वापरतात आणि शेतकऱ्यांची हेळसांड करतात अशी लोकांची भावना आहे.परिणामी साखर पट्ट्यातील शेतकऱ्यांची चेष्टा होत आहे.वरिष्ठ नेते त्यांची लांगुलचांगुलपणा करतात अशी कुजबूज कालच्या सभेत चालू होती,म्हणून आपण एक स्वाभिमानी मुख्यमंत्री आहेत.आपण केलेली घोषणा बद्दल आम्हाला आनंद झाला असल्याचे म्हंटले आहे.आमच्या मनात याबाबत कुठलीही शंका नाही.मात्र शेतकऱ्यांची उसाचा काटा मारण्याची पद्धत कधी संपणार याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी झालेल्या आहेत,यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी,सहकार मंत्री यांनी याबाबत कोणतेही लक्ष दिलेले नाही.त्या त्या वेळेच्या सरकारांनी कधी ढुंकूनही बघितले नाही.मात्र आपण नुकतीच केलेली घोषणा लोकांना खूप आवडली आहे.दोन्हीही कारखान्यांना कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,निफाड व येवला तालुक्यातील ऊस दिला जातो व सभासद पण आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे मात्र ही केवळ घोषणा ठरू नये अशी लोक भावना आहे.त्याचप्रमाणे ऊस कारखान्यातून उपपदार्थाचे निर्मिती होती त्या उपक्रमातून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही हिस्सा मिळत नाही.त्यांनी प्रत्येक उपपदार्थ निर्मिती उद्घाटनाच्या वेळी केलेल्या घोषणा केवळ शब्दांचा बुडबुडा ठरलेला आहे.या उलट साखर सम्राट आपली घरे मात्र भरून घेताना दिसत आहे.कोळपेवाडी व संजीवनी म्हणजेच काळे व कोल्हे यांच्या कारखान्यापासून काटा मारण्याची चौकशी करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात आपणही शेतकऱ्यांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे आणि आपण निश्चितपणे हे कर्तव्य पार करणार यात आम्हाला शंका नाही असे शेवटी बाबा डमाळे यांनी शेवटी म्हंटले आहे.