जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात…दादांची छबी गायब !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
  

     उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण यासह कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी प्रकल्प आणि पोटॅश प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते उद्या रविवारी दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी संपन्न होणार आहे.त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.रस्ते आणि शहरे नेत्यांच्या प्रतिमांनी सजले असून एका ज्येष्ठ दादांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याने मोठी चर्चा झडत आहे.तर अनेक शेकडो बळी घेणाऱ्या नादुरुस्त रस्त्यांचे  येणाऱ्या केंद्रीय मंत्र्यामुळे भाग्य उजळले आहे.ते दुरुस्त करण्याची प्रशासनाने कोण घाई उठली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नारिकाना किडा मुंगी ठरवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि येथील नेत्यांवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान शहर आणि तालुक्यात चौकाचौकात उभे करण्यात आलेल्या प्रतिमांमधून आपल्या उजळून घेऊन प्रतीमामंडन करून घेतले जात आहे.कोपरगाव तालुक्यात मात्र भाजपच्या स्थानिक नेत्याचे तथा माय लेकांचे छायाचित्र झळकले असले तरी एका ज्येष्ठ दादांचे छायाचित्र मात्र या प्रतीमा मंडणातून वगळले गेले असल्याने तालुक्यात जोरदार उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान यावर एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने फार सूचक सवाल केला आहे,”तुम्हाला दादांचा फोटो छापून बोर्डातील मजकूर कमी करायचा आहे का ?

   राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी काल दिली आहे.दरम्यान या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पर्यावरण व पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित राहाणार आहेत.

दरम्यान या अहील्यानगर दौऱ्यात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही सामील असताना निदान कोपरगाव तालुक्यात तरी त्यांच्या स्वागताचे फलक महायुतीचे आ.आशुतोष काळे यांनी लावलेले दिसत नाही हे या दौऱ्याचे विशेष !

   दरम्यान प्रवरानगरला रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आगमन होणार आहे त्या नंतर ते विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर लोणी येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहे.दुपारी १ वाजता लोणी येथील बाजारतळावर अमित शहा यांची सभा होणार आहे.शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रवरा परिवाराने सुरू केली असून दुपारी ते तो कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर कोपरगाव कडे रवाना होणार आहे.इकडेही सहकार महर्षी कोल्हे कारखान्याने संजीवनी विद्यापीठ परिसरात जोरदार तयारी केली असून पावसाची शक्यता लक्षात घेऊन तसे मोठे सभामंडप उभारले आहे.त्यासाठी केंद्रीय सुरक्षा विभाग आणि राज्य पोलिसांच्या वतीने दक्षता घेतली जात असून मोठ्या बॅगा,टॅब,संशयास्पद वस्तू नेण्यास आधीच प्रतिबंध घातला आहे.त्यासाठी संजीवनी समूहाच्या वतीने तसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

    

दरम्यान या कोपरगाव दौऱ्यात अमित शहा यांना आणण्यात येण्याचे कारण म्हणजे दूध संघाचे जागेबाबत सर्वोच्च भांडण मिटवल्याने व त्यांच्या शब्दाला मान दिल्याने त्यांनी युवराज विवेक कोल्हे यांचे पुनर्वसन करावे ही साधी अपेक्षा वर्तवली जात असून याबाबत चाणक्य अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना टाळून आगामी काळात काय देणार याकडे राजकीय निरीक्षकांचे आणि कोल्हे हितचिंतकांचे पक्ष लागून राहिले आहे.

   दरम्यान शहर आणि तालुक्यात चौकाचौकात उभे करण्यात आलेल्या प्रतिमांमधून आपल्या उजळून घेऊन प्रतीमामंडन करून घेतले जात आहे.कोपरगाव तालुक्यात मात्र भाजपच्या स्थानिक नेत्याचे तथा माय लेकांचे छायाचित्र झळकले असले तरी एका ज्येष्ठ दादांचे छायाचित्र मात्र या प्रतीमा मंडणातून वगळले गेले असल्याने तालुक्यात जोरदार उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.चर्चा सुरू आहे.

     दरम्यान या अहील्यानगर दौऱ्यात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही सामील असताना निदान कोपरगाव तालुक्यात तरी त्यांच्या स्वागताचे फलक महायुतीचे आ.आशुतोष काळे यांनी लावलेले दिसत नाही हे या दौऱ्याचे विशेष !

                 ————————————-

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close