जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

हरित लवादाने…या कारखान्यास ठोठावला ३९.३० लाखांचा दंड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

      साखर व दारु कारखानदार त्याच त्या क्षेत्रात वारंवार स्पेन्ट वॉश ओतताना दिसत असून परिणामी शेतीचा पोत खराब होत आहे स्पेंट वाॅश हा एक आम्ल पदार्थ जमीनीत पडल्यानंतर जमीनीतील जीवाणू नष्ट होतात परिणामी तो जास्त पडल्यानंतर जमीनीत खोलवर त्याचा अर्क उतरतो,त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जाऊन नदी व नाल्याचे पाणी प्रदुषीत होत असून हि मोठी डोकेदुखी ठरली असून याबाबत सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर पुणे येथील हरित लवादाने नगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास ३९.३० लाखांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार उत्तम मोकळं यांनी मोठ्या धिटाईने या प्रसंगाचा सामना करून पुणे येथील हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती.त्याची गंभीर दखल हरित लवादाने घेतली असून त्याची समितीच्या माध्यमातून पाहणी करून स्थळ पंचनामा करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्यास नुकताच ३९.३० लाखांचा दंड ठोठावला आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पश्चिम महाराष्ट्रातील साखर व दारू कारखानदार हे गेली अनेक वर्षे परिसराच्या शेतकऱ्यांच्या शेतात अनिर्बंध स्पेन्ट वॉश टाकत आहे हि गंभीर बाब आहे.कृषी विद्यापीठाने केवळ एकदाच एका शेतात हेक्टरी दहा हजार लिटर स्पेन्ट वाॅश टाकण्याची अनुमती दिलेली आहे.ज्या क्षेत्रात स्पेन्ट वॉश टाकले त्यां क्षेत्रात विद्यापीठ जाऊन नऊ इंच खोल पर्यंतची माती परिक्षणासाठी घेऊन जाणार असल्याची तरतूद होती.प्रदुषण महामंडळ देखील त्यावर आपला अंकुश ठेवणार अशी त्या प्रकल्पात तरतूद आहे.साखर व दारु कारखानदार त्याच त्या क्षेत्रात वारंवार स्पेन्ट वॉश ओतताना दिसत असून परिणामी शेतीचा पोत खराब होत आहे.

स्पेंट वाॅश हा एक आम्ल पदार्थ असून त्याचा पी.एच.३.५० ते ४.५० असा आहे.हा पदार्थ जमीनीत पडल्या नंतर जमीनीतील सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात परिणामी तो जास्त पडल्यानंतर जमीनीत खोलवर त्याचा अर्क उतरतो,त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जाऊन नदी व नाल्याचे पाणी प्रदुषीत होत आहे.परिणामी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जायकवाडी येथील धरणातील पाणी पिण्यायोग्य नाही असा प्रदूषण महामंडळाने इशारा देऊनही त्याकडे सत्ताधारी वर्गाने दुर्लक्ष केलं असल्याचे या पूर्वी उघड झाले होते.परिणामी साखर आणि मद्य सम्राटांच्या दबावामुळे शेतीची पिके तसेच जलचरांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.दारुच्या कारखान्यांनी स्पेन्ट वाॅश जाळावे अशी केंद्र शासनाची धारणा आहे.परंतु प्रत्यक्षात कोणताच दारू कारखाना हे नियम पाळत नाही हि दुर्दैवी बाब समोर येत आहे.

  

दरम्यान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे बाबतीत ०७-०८ वर्षापूर्वी कोळपेवाडी येथील कोळपे नामक शेतकऱ्याने कारखान्याचे पूर्व भागात भूजल प्रदूषित झाल्याने तक्रार केली होती.त्याची गंभीर दखल हरित लवादाने घेतली होती.मात्र संबधित शेतकऱ्याने सामाजिक हित सोडून आपला वैयक्तिक स्वार्थ पाहील्याने अनर्थ झाला होता.

  कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना त्यांचे कारखान्याचे शेजारी असलेल्या नारंदी नदीच्या दोन्ही बाजूला जमीनीवर पेन्ट वॉश टाकत असल्याची बाब उघड झाली होती.त्याचा प्राणी जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.स्पेन्ट वाॅश मुळे शेजारील नारंदी नदीपात्राचे पाणी काळेशार झाले असल्याची धक्का दायक बाब उघड झाली होती.हे पाणी गोदावरी नदीपात्रात मिसळले जाते.सध्या गोदावरी नदीच्यापात्रात सडे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पाणी साचलेले असल्यामुळे पाणी प्रदुषीत होऊन जलचरांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे बाब या पूर्वी सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या व जलचर नष्ट होत असल्याची सप्रमाण तक्रार केली होती.मात्र प्रदूषण महामंडळाने त्याकडे डोळेझाक केली होती.पुढे या तक्रारींचे काय झाले हे जाधव यांनी सांगितले नाही.आता अशीच बाब कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत उघड झाली आहे.तशी या पूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनीही याबाबत प्रदूषण महामंडळाला निवेदन देऊन ३१ जानेवारी २०२३ मध्ये ही बाब उघड केली होती.व उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.असून याबाबत ज्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील शेतकरी उत्तम मनोहर मोकळं यांच्या दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी ही बाब लक्षात आल्याने त्याने आपली तक्रार पुणे येथील हरित लवाद यांचेकडे मागील महिन्यात केली होती.त्याने याबाबत आवाज उठवल्यावर त्याला तेथील कारखान्याचे कर्मचारी यांनी कार्यकारी संचालक यांचे नावाने दमदाटीचा सामना करावा लागला होता.तरीही त्याने मोठ्या धिटाईने या प्रसंगाचा सामना करून पुणे येथील हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती.

  

या पूर्वी गोदावरी जलप्रदूषणाबाबत सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या व जलचर नष्ट होत असल्याची सप्रमाण तक्रार केली होती.मात्र प्रदूषण महामंडळाने त्याकडे डोळेझाक केली होती.तर दोन वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.त्याचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही.

   

  दरम्यान त्याची गंभीर दखल हरित लवादाने घेतली असून त्याची समितीच्या माध्यमातून पाहणी करून स्थळ पंचनामा करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्यास नुकताच ३९.३० लाखांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान कोळगाव माळ येथील शेतकरी उत्तम मोकळं यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तक्रारदार उत्तम मोकळ यांच्या वतीने ॲड.मैत्र्येय घोरपडे यांनी काम पाहिले तर कारखान्याचे वतीने ॲड.अनिरुद्ध कुलकर्णी यांनी काम पाहिले आहे.यावर न्या.दिनेश कुमार सिंग यांनी हा आदेश दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी दिला आहे.

   दरम्यान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे बाबतीत ०७-०८ वर्षापूर्वी कोळपेवाडी येथील कोळपे नामक शेतकऱ्याने कारखान्याचे पूर्व भागात भूजल प्रदूषित झाल्याने तक्रार केली होती.त्याची गंभीर दखल हरित लवादाने घेतली होती.मात्र संबधित शेतकऱ्याने सामाजिक हित सोडून आपला वैयक्तिक स्वार्थ पाहून याच कारखान्यात नोकरी पत्करून सामाजिक हिताचा बळी दिला होता व त्यातून आपले अंग काढून घेतल्याने हा पेच तसाच राहिला होता.आता कोळपेवाडी येथील शेतकरी याबाबत आवाज उठवणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

                 ———————————-

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close