जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या पतसंस्थेचा मार्च अखेर मोठा व्यवसाय-अध्यक्षांची माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

        नुकत्याच झालेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ३ कोटी ३५ लाख नफा झाला यामधून यामध्ये ३६० कोटी रूपयांच्या ठेवी तर २३५कोटी रूपयांची कर्ज वितरीत केली आहे.संस्थेची गुंतवणूक १४८ कोटी रूपयांची इतकी विक्रमी झाली असून या संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५९५ कोटी इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी आमच्या प्रतीनिधिशी बोलताना दिली आहे.

“ज्योती पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ठेवीमध्ये ४३ कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १४% आहे.तसेच कर्ज वाटपामध्ये २७ कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १३% व गुंतवणुकीमध्ये २०कोटी ची इतकी वाढ झाली आहे”-ऍड.रवींद्र बोरावके,अध्यक्ष,ज्योती सहकारी पतसंस्था,कोपरगाव.


     
   सहकारात पतसंस्थेत अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेच्या सभासद व ठेवीदारांनी लक्षवेधी प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे.लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन-२०२३-२४ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला आहे.संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पुर्ण करून ठेवी,कर्जे,भागभंडवल व गुंतवणूक या सर्वामध्ये वाढ झालेली दिसुन येत आहे.संस्थेच्या ३७ वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येतो.महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणुन हि ओळख निर्माण झाली आहे.  

ॲड.रवींद्र बोरवके,अध्यक्ष,ज्योती सहकारी पतसंस्था.

“ज्योती सहकारी पतसंस्थेने लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पुर्ण करून सन-२०२३-२४ या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला आहे”-सुरेश शिंदे,सरव्यवस्थापक,ज्योती सहकारी पतसंस्था.

         
       
      कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले.मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली यापुढे यात सातत्य राखले जावुन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल तसेच संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बोरावके यांनी दिली आहे.सामान्य नागरीक व इतर संस्थासाठी ठेवीच्या आकर्षक ठेव योजना सुरु केलेल्या आहेत.नव्या वर्षात छोटया मोठ्या उदयोजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
         
   ज्योती पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ठेवीमध्ये ४३ कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १४% आहे.तसेच कर्ज वाटपामध्ये २७ कोटी ची इतकी वाढ झाली असुन तिचे प्रमाण १३% व गुंतवणुकीमध्ये २०कोटी ची इतकी वाढ झाली आहे.तसेच मागील वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत यावर्षी ७० लाख ची एवढी वाढ झाली असुन त्याचे  प्रमाण २६% इतके आहे.संस्थेची कर्ज वसुली समाधानकारक असुन नेट एन पी ए  0%  इतका आहे.
      
   दरम्यान या संस्थेच्या प्रगतीत सभासद,ठेवीदार,खातेदार,कर्जदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी संस्थेचे सर्व संचालक,शाखधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.असे संस्थेचे अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कारभारी जुंधारे,संस्थेचे व्यवस्थापक सुरेश शिंदे,संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक सुनिल क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेच्या या यशाबद्दल सभासदांत सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close