सहकार
…या कारखान्याने घेतला वीज निर्मितीचा निर्णय-…या नेत्याची घोषणा

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
सहकारात अग्रणी असलेल्या उत्तर नगर जिल्ह्यातील शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने सुमारे १० मेगाव्हॅटचे टर्बाईन विकत घेऊन त्यातून सुमारे ६-७ मेगाव्हॅट वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून निर्माण होणारी वीज ही राज्याच्या महावितरण कंपनीस वितरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केला आहे.

सदर प्रसंगी त्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या खात्यावर पंधरा दिवसात आपण पहिला हप्ता वर्ग केला असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केला असून अंतिम दर काय देणार या बाबत मौन पाळले आहे.त्यामुळे त्याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
उत्तर अहील्यानगर जिल्ह्यात गौतमनगर येथे सहकारात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा रविवार दि.२३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ७० व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राहुल रोहमारे व त्यांच्या धर्मपत्नी सोनाली रोहमारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.

प्रत्येक सहकारी साखर कारखान्यात कोणताही कार्यक्रम करताना संस्थापक यांच्या प्रतिमेचे पूजन होताना दिसत आहे.मात्र कोपरगाव आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना याला अलीकडील दशकात अपवाद ठरताना दिसत आहे.विशेष म्हणजे संस्थापक यांचे नातलग व्यासपीठावर असताना हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहताना दिसत आहे हे मोठे दुर्दैव शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,माजी सभापती सुरेश जाधव,माजी उपसभापती राजेंद्र निकोले,संचालक संचालक सुनील शिंदे,प्रशांत घुले,सचिन चांदगुडे,राजेंद्र घुमरे,एम.टी.रोहमारे,प्रशांत वाबळे,माजी सरपंच बाळासाहेब जपे,पद्मकांत कुदळे,संचालक औताडे,ऍड.शिरीषकुमार लोहकणे,आदीसह प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,विविध विभागाचे विभाग प्रमुख,विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी,ऊसउत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी ६-७ मेगाव्हॅट ऊर्जा निर्मितीतून कारखान्यास ७-७.५ कोटी तर एक मिल वाढवल्यावर ‘ब’ गॅस मध्ये जाणारी साखर वाचणार असून त्यातून जवळपास १५ कोटी रुपयांचा फायदा कारखाण्यास होणार असल्याचे सांगितले आहे.त्याचे सभासदांनी स्वागत केले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण काळे कारखान्याचे दोन टप्प्यात आधूनिकिकरण व विस्तारीकरण केले असून त्याचा परिणाम ऊर्जा वाढविण्यावर परिणामी ‘ब ‘ गॅस वाचवण्यावर उपयुक्त होत आहे.परिणामी गतवर्षी कारखान्यास वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.परिणामी पांढरी शुभ्र उच्च प्रतीची साखर निर्मिती करण्यास यश आले आहे.त्यामुळे व्यापारीवर्गात साखरेची मोठी मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगून प्रतिदिनी साडेसहा ते सात लाख मेट्रिक टन गाळप होण्यासाठी नवीन क्रशर मिल वाढवण्यात येत आहे.सदर काम आगामी हंगामात पूर्ण करण्याचे निर्धारीत केले आहे.
दरम्यान साखर धंद्यातील अडचणींबाबत बोलताना ते म्हणाले की,”यंदाचा साखर हंगाम हा कमी ऊसाचा व टंचाईचा होता.तो १६० दिवसांचा होणे अपेक्षित असताना तो केवळ ९०-१२० दिवसांचा होत आहे.परिणामी कमी साखर उतारा मिळाला असून त्यातून कारखान्याचे आर्थिक नियोजन कोसळत असल्याचे सांगून राज्यात या हंगामात ९९ सहकारी तर खाजगी १०१ असे एकूण २०० साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले आहे.त्यातून ८३४.४१ लाख मे.टन उसाचे राज्यात गाळप होऊन त्यातून ७९२.५९ लाख मे.टन साखर उत्पादन राज्यात झाले आहे.त्याचा सरासरी साखर उतारा हा १०.२८,% इतका राहिला आहे.त्यात जवळपास पाऊण टक्क्यांची घसरण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.गत पंचवीस वर्षात खाजगी कारखाने मोठ्या म्हणजेच निम्म्याने वाढले असल्याचा दावा करून ही वाढण्याची गती प्रचंडअसल्याचा दावा केला आहे.
काळे सहकारी साखर कारखान्याचे या वर्षी एकूण गाळप ६.५ लाख टनाचे ठेवले होते.मात्र कारखाना कार्यक्षेत्रात ऊस कमी असल्याने कार्यक्षेत्राबाहेरून जवळपास ०२ लाख ७० हजार २७४ टन ऊस बाहेरून आणावा लागला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.कार्यक्षेत्रात पाणी टंचाई असल्याने बराच ऊस हा चारा म्हणून अन्य कारणासाठी वापरला गेला आहे.शेतकऱ्यांचा आपला ऊस बारा महिन्यात तुटला पाहिजे या मानसिकतेमुळे साखर उतारा कमी मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान त्यांनी सिंचनाच्या पाणी टंचाईवर बोलताना शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाचा पाणी मिळण्याचा सात क्रमांकाचा फॉर्म भरणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.त्यातून शेतकऱ्यांची पाण्याची मागणी समजते असे म्हंटले आहे.मात्र शेतकरी याबाबत दक्ष नसल्याचा खेद व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी प्रारंभी कारखाना संचालक राहुल रोहमारे व त्यांच्या धर्मपत्नी सोनाली रोहमारे यांच्या हस्ते विधिवत पूजा विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली होती.या वेळी प्रास्तविक कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे.त्यात त्यांनी नुकत्याच संपलेल्या गाळपाचा आढावा घेतला आहे तर उपस्थिंताचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले आहे.