सहकार
…या साखर कारखान्याचा सांगता समारंभ होणार !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर अहील्यानगर जिल्ह्यात गौतमनगर येथे सहकारात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा रविवार दि.२३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ७० व्यां गळीत हंगामाचा सांगता समारंभ माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अग्रणी आहे.त्यांचा हंगाम आगामी २३ मार्च रोजी संपत आहे.त्याचा सांगता समारंभ सकाळी १० वाजता संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे हे राहणार आहे.
देशातील बहुतांश ठिकाणचा उसाचा गळीत हंगाम संपत आला आहे.काही ठिकाणीच उसाचे गाळप सध्या सुरु आहे.दरम्यान,ऊस कारखान्याला गेल्यानंतर चौदा दिवसांच्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत असा नियम आहे.त्याप्रमाणे बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिली आहे.तर काही कारखान्यांनकडे अद्यापही देणी बाकी आहेत.दरम्यान,आत्तापर्यंत १६ हजार कोटी रुपयांची देणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहेत.देशातील साडेपाच कोटी कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात ०५ हजार कोटी रुपयांची देणी देण्यात आली आहेत.यात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना अग्रणी आहे.त्यांचा हंगाम आगामी २३ मार्च रोजी संपत आहे.त्याचा सांगता समारंभ सकाळी १० वाजता संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे हे राहणार आहे.तर कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे व त्यांची धर्मपत्नी सोनाली रोहमारे यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे.
त्यासाठी कारखाना सभासद आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे व काळे सहकारी कारखान्याचे प्रभारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे.