सहकार
सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नावर लवकरच बैठक होणार …!

न्युजसेवा
मुंबई -(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या सर्व विविध प्रश्न आणि विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रोखे वितरण कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली आहे.

“सहकारी पतसंस्थांना वारंवार सहकार खात्याकडे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने हेलपाटे मारावे लागतात.हेलपाटे मारावे लागणार नाही अशा प्रकारचे कायद्यात बदल करण्याच्या देखील सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहे”- ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी या प्रसंगी राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे निवेदन देत सहकारी पतसंस्थांच्या समस्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार राज्यमंत्री पंकज भोईर यांच्या उपस्थितीत मांडल्या होत्या त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार मंत्री,राज्य सहकार मंत्री व सहकार आयुक्त यांना आदेश देत तातडीने बैठक बोलवून निर्णय घेण्याचा आदेश दिला.या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी,राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.
सहकारी पतसंस्थांना वारंवार सहकार खात्याकडे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने हेलपाटे मारावे लागतात.हेलपाटे मारावे लागणार नाही अशा प्रकारचे कायद्यात बदल करण्याच्या देखील सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.परंतु सहकारी पतसंस्थांनी देखील काही बंधने पाहण्याचे गरज असल्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ५०० कोटी रुपयांची कर्ज रोखे काढण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली या बद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे देखील अजित पवार यांनी अभिनंदन केले व या कर्ज रोख्यात गुंतवणूक करण्यास सहकारी पतसंस्थांना परवानगी द्यावी व गुंतविलेली रक्कम वैधानिक तरलता निधीमध्ये धरता यावी असे परिपत्रक २४ तासाचे आत काढण्याचे आदेश मंत्री अजित पवार यांनी सहकार आयुक्त यांना या प्रसंगी दिले असल्याची माहिती शेवटी दिली आहे.