जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

राजस्थानचे राज्यपाल कोपरगावात येणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)


गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पा.तालुका सहकारी संघाच्या १.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प,मिल्क क्लेरीफायर मशीन,कंट्यूटुनियस खवा मेकिंग मशीन,पाणी शुध्दीकरण यंत्रणा व पाणी साठवण तलाव आदीं प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ सोमवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संघाच्या सहजानंदनगर या कार्यस्थळावर संपन्न होत असून त्यासाठी त्याचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे करणार असून त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकष्ण विखे हे राहणार आसल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  

गोदावरी परजणे दूध संघाने आपला दुग्ध उद्योगात राज्यात लौकिक स्थापन केला आहे.आता त्यांची पुढील विकासाची सौर ऊर्जेची झेप सुरू झाली आहे.त्यासाठी त्यांनी १.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे.शिवाय खवा बनविण्यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञान मिळवले असून त्यासाठी,’कंट्यूटुनियस खवा मेकिंग मशीन’ प्राप्त केले आहे.त्याचा शुभारंभ आगामी २० जानेवारी रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

   भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आणि दुग्धजन्य पदार्थांचा ग्राहक आहे,त्याच्या दुधाच्या उत्पादनापैकी जवळपास १००% वापर करतो.भारतीय दुग्ध उद्योग २०२६ पर्यंत १५% वर्ष-दर-वर्षाच्या सी.ए.जी.आर. ने विस्तारून रु.९.७ ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.गायी आणि म्हशीच्या दुधाच्या मागणीसह,भारताचा दुग्ध उद्योग इतर दुग्धउत्पादक राष्ट्रांच्या तुलनेत अद्वितीय स्थानावर आहे.भारतातील बहुतांश दूध उत्पादन द्रवरूप दूध म्हणून विकले जात असताना प्रति जनावराचे सरासरी दूध उत्पादन मात्र लक्षणीयरीत्या कमी आहे.यामुळे,एकूण मूल्यवर्धन आणि विकासासाठी प्रचंड क्षमता असलेला उद्योग हा क्रॉसरोडवर असल्याचे मानले जात आहे.त्यासाठी अलीकडील काळात अत्याधुनिक डेअरी प्रणाली लागू करणे हे प्रत्येक डेअरी फार्म सल्लागाराचे अथवा अध्यक्षांचे स्वप्न असते.प्रमाणित प्रक्रिया दस्तऐवजांच्या दुर्मिळ उपलब्धतेमुळे उद्योग अजूनही त्रस्त आहे ज्यामुळे योग्य संवादाचा अभाव (अंतर्गत आणि बाह्य),फीड व्यवस्थापनातील गैरव्यवस्थापन,स्वच्छता पद्धती,इनपुट वि आउटपुट,कचरा व्यवस्थापन,मनुष्यबळ वापर,जाती निवड आणि ट्रॅकिंग,मूल्य जोड आणि दुग्धव्यवसाय नफा,दुग्धशाळा सल्ला सेवा या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.या पातळीवर गोदावरी परजणे दूध संघाने आपला लोकिक स्थापन केला आहे.आता त्यांची पुढील विकासाची सौर ऊर्जेची झेप सुरू झाली आहे.त्यासाठी त्यांनी १.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे.शिवाय खवा बनविण्यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञान मिळवले असून त्यासाठी,’कंट्यूटुनियस खवा मेकिंग मशीन’ प्राप्त केले आहे.या शिवाय पाणी शुध्दीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण तलाव पूर्ण केला असून त्याचे शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते करण्याचे ठरवले आहे.त्यासाठी अध्यक्षस्थानी राज्याचे नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे हे राहणार आहे.

   सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राज्याचे नूतन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे,राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शाह,वैजापूरचे आ.रमेश बोरनारे,आ.आशुतोष काळे,नेवासा आ.विठ्ठल लंघें,पारनेर आ.काशिनाथ दाते,संगमनेर आ.अमोल खताळ आदी उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेतकरी,दूध उत्पादन आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close