जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या बँकेस देश पातळीवर दोन पुरस्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या  गौतम सहकारी बँकेच्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल बँकिंग फंड्रीयरचा ‘बेस्ट ॲन्युअल रिपोर्ट’ प्रमाणे नागरी सहकारी बँकेच्या गटात ‘बँकिंग  फंड्रीयर’ मुंबई या संस्थेचा नागरी सहकारी बँक या कॅटेगरीतील २०२४चा पुरस्कार मिळालेला आहे.तसेच या बँकेस २०२४ वर्षातील बॅको अवीज पब्लिकेशन चा नागरी सहकारी बँकामधुन बेस्ट टर्न अराउंड बँक या कॅटेगिरीत ‘बँको ब्लू रिबन’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली  आहे.जानेवारी महिन्यात ‘गौतम सहकारी बँकेला’ लोणावळा येथे पुरस्कार प्रदान करणार असल्याचे बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी सांगितले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ध्येय धोरणावर  ‘गौतम सहकारी बँक’ बॅकींग क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करीत आहे.बँकेला अनेक पुरस्कार मिळालेले असून बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.

   कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक स्व.माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी ‘गौतम सहकारी बँकेची’ स्थापना केली. ‘गौतम सहकारी बँकेची’ स्थापना केल्या पासून बँकेच्या कारभारात २००४ चा अपवाद वगळता काटकसरीचा पायंडा पाडून बँकेस आर्थिक शिस्त लावलेली आहे.आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ बँकेचा कारभार पाहत आहेत.या कार्यकुशलतेमुळे बँकेने ग्राहकांचा विश्वास जिंकला असून  बँकिंग क्षेत्रातील आदर्श नागरी बँक म्हणून महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

            कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ध्येय धोरणावर  ‘गौतम सहकारी बँक’ बॅकींग क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करीत आहे.बँकेला अनेक पुरस्कार मिळालेले असून बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.यामुळे गौतम सहकारी बँकेचा दर्जा हा उंचावलेला आहे. १०० ते ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या गटातून बँकेस हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन,व्हॉ.चेअरमन व सर्व संचालक मंडळासह कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close