जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

सुदृढ बँकेसाठी कर्ज वसुली व्यवस्थापन महत्वाचे-आवाहन

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   सहकारी बँक आर्थिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम ठेवण्यासाठी कर्ज वसुलीचे योग्य नियोजन करणे खूप महत्वाचे असून सदर कर्ज खाते थकीत होणार नाही व कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज वसुली करून आपल्या बँकेचा फायदा करून द्यावा असे आवाहन,’जिल्हा बँक असोसियशन’चे अध्यक्ष स्त्येन मुंदडा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कर्जाची भरपाई तुमच्यासाठी खूप जास्त झाली तर परिस्थिती त्वरीत भयानक स्वप्नात बदलू शकते.या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे ग्राहक क्रेडिट समुपदेशकाच्या मदतीने कर्ज व्यवस्थापन योजना स्थापन आणि अंमलात आणली जाते”- राजेश यादव,प्रशिक्षक,कर्ज वसुली व्यवस्थापन संस्था.

  गंभीर खरेदी करण्यासाठी पैसे उधार घेतल्याने तुम्हाला तुमच्या आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते,परंतु जर कर्जाची भरपाई तुमच्यासाठी खूप जास्त झाली तर परिस्थिती त्वरीत भयानक स्वप्नात बदलू शकते.या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे ग्राहक क्रेडिट समुपदेशकाच्या मदतीने कर्ज व्यवस्थापन योजना स्थापन आणि अंमलात आणली जाते.कर्ज व्यवस्थापन योजना तुम्हाला एक मासिक पेमेंट करण्याची परवानगी देते ज्यामध्ये तुमची सर्व असुरक्षित बिले समाविष्ट असतात.कर्ज परतफेड योजना ही कर्ज नसते आणि ती तुम्हाला तुमच्या देणीपेक्षा कमी पैसे देऊ देत नाही,परंतु ते परतफेड प्रक्रिया सुलभ करू शकते आणि कर्जातून लवकर बाहेर पडण्यास मदत करू शकते.या साठी कर्जदरांचे व कर्जपुरवठा संस्थानचे समुदेशन करणे ही बाब महत्त्वाची मानली जाते त्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज वसुली व्यवस्थापन या विषयावर शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री’येथे ज्ञानसत्राचे आयोजन केले होते त्यावेळी जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा बोलत होते.

   सदर ज्ञानसत्रात जिल्ह्यातील वीस बँकांचे एकूण पंचेचाळीस प्रतिनिधी उपस्थित होते.पुणे येथील कर्ज वसुली व्यवस्थापन तज्ञ राजेश यादव हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते व जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे विश्वस्त माधवराव देशमुख व वसंतराव आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

   सदर प्रसंगी माधवराव देशमुख,प्रशिक्षक राजेश यादव आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.अतिशय सोप्या भाषेत कर्ज खाते कसे थकणार नाही व कर्ज देताना घ्यावयाची काळजी,करावयाचे करार,तसेच कर्ज वसुलीचे विविध कायदे व उपलब्ध पर्याय याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान सदर ज्ञानसत्रामध्ये सर्व सहभागी बँक अधिकाऱ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

    याप्रसंगी ज्ञानसत्राचे समन्वयक बारामती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी नवनाथ जगताप,असोसिएशनचे श्री काकडे व पूनम बुरा मॅडम यांचा सत्कार करण्यात आला आहे.
   सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री काकडे यांनी तर उपस्थितांचे आभार नवनाथ जगताप यांनी मानले आहे.

सहकारी बँक आर्थिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम ठेवण्यासाठी कर्ज वसुलीचे योग्य नियोजन करणे खूप महत्वाचे असून सदर कर्ज खाते थकीत होणार नाही व कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज वसुली करून आपल्या बँकेचा फायदा करून द्यावा असे आवाहन,’जिल्हा बँक असोसियशन’चे अध्यक्ष स्त्येन मुंदडा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

   गंभीर खरेदी करण्यासाठी पैसे उधार घेतल्याने तुम्हाला तुमच्या आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते,परंतु जर कर्जाची भरपाई तुमच्यासाठी खूप जास्त झाली तर परिस्थिती त्वरीत भयानक स्वप्नात बदलू शकते.या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे ग्राहक क्रेडिट समुपदेशकाच्या मदतीने कर्ज व्यवस्थापन योजना स्थापन आणि अंमलात आणली जाते.कर्ज व्यवस्थापन योजना तुम्हाला एक मासिक पेमेंट करण्याची परवानगी देते ज्यामध्ये तुमची सर्व असुरक्षित बिले समाविष्ट असतात.कर्ज परतफेड योजना ही कर्ज नसते आणि ती तुम्हाला तुमच्या देणीपेक्षा कमी पैसे देऊ देत नाही,परंतु ते परतफेड प्रक्रिया सुलभ करू शकते आणि कर्जातून लवकर बाहेर पडण्यास मदत करू शकते.या साठी कर्जदरांचे व कर्जपुरवठा संस्थानचे समुदेशन करणे ही बाब महत्त्वाची मानली जाते त्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज वसुली व्यवस्थापन या विषयावर शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री’येथे ज्ञानसत्राचे आयोजन केले होते त्यावेळी जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा बोलत होते.

   सदर ज्ञानसत्रात जिल्ह्यातील वीस बँकांचे एकूण पंचेचाळीस प्रतिनिधी उपस्थित होते.पुणे येथील कर्ज वसुली व्यवस्थापन तज्ञ राजेश यादव हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते व जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे विश्वस्त माधवराव देशमुख व वसंतराव आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

   सदर प्रसंगी माधवराव देशमुख,प्रशिक्षक राजेश यादव आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.अतिशय सोप्या भाषेत कर्ज खाते कसे थकणार नाही व कर्ज देताना घ्यावयाची काळजी,करावयाचे करार,तसेच कर्ज वसुलीचे विविध कायदे व उपलब्ध पर्याय याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान सदर ज्ञानसत्रामध्ये सर्व सहभागी बँक अधिकाऱ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

    याप्रसंगी ज्ञानसत्राचे समन्वयक बारामती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी नवनाथ जगताप,असोसिएशनचे श्री काकडे व पूनम बुरा मॅडम यांचा सत्कार करण्यात आला आहे.
   सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन श्री काकडे यांनी तर उपस्थितांचे आभार नवनाथ जगताप यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close