निधन वार्ता
माजी अभियंता भुतडा यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभियंता रामेश्वर लालचंद भुतडा (वय-८०)यांचे काल सायंकाळी ४.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,दोन मुले,दोन मुले आदी परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे आज सकाळी ०९ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान कोपरगाव तहसील कार्यालय,कोपरगाव पंचायत समिती कार्यालय
भारतीय आयुर्विमा महामंडळ कोपरगावची इमारती त्यांच्याच मार्गदर्शनात झाले आहे.भारतीय टेलिफोन महामंडळाच्या दोंडाईचा,लातूर,जळगाव,कोपरगाव, शिर्डी,श्रीरामपूर,मखमलाबाद,कोळपेवाडी,अजंगवडेल,वैजापूर,नाशिकरोड आदी इमारती,साईबाबा संस्थानचे स्टाफ कॉर्टर, आय.टी.आय.इमारत त्यांच्या कामाच्या साक्ष आगामी काळात देत राहतील.
स्व.रामेश्वर भुतडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात मुंबई येथे प्रारंभी नोकरी केली होती.त्यांच्या काळात मुंबई येथील मरीन ड्राइव्ह येथील एअर इंडियाची इमारत बांधकामात त्यांचा सहभाग होता.या खेरीज नाशिक येथील बी.वाय.के.कॉलेज एम.बी.ए.ची प्रशस्त वास्तू त्यांच्या कामाची साक्ष देत उभी आहे.या शिवाय कोपरगाव येथील पिपल्स कॉ ऑप बँकेची,संगमनेर,सिन्नर,येवला व कोपरगाव मर्चंट बँकेच्या इमारतीचे काम त्यांच्या काळात व त्यांच्या मार्गदर्शनात झाले होते.
दरम्यान कोपरगाव तहसील कार्यालय,कोपरगाव पंचायत समिती कार्यालय
भारतीय आयुर्विमा महामंडळ कोपरगावची इमारती त्यांच्याच मार्गदर्शनात झाले आहे.भारतीय टेलिफोन महामंडळाच्या दोंडाईचा,लातूर,जळगाव,कोपरगाव, शिर्डी,श्रीरामपूर,मखमलाबाद,कोळपेवाडी,अजंगवडेल,वैजापूर,नाशिकरोड आदी इमारती,साईबाबा संस्थानचे स्टाफ कॉर्टर, आय.टी.आय.इमारत त्यांच्या कामाच्या साक्ष आगामी काळात देत राहतील.
त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,संजय सातभाई,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.