जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या साखर कारखान्याचा अंतिम भाव जाहीर ?

जाहिरात-9423439946

युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )

  राज्यात सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गत २०२३-२४ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन २ हजार ८२५ रुपये,जूनमध्ये प्र.मे.टन १०० रुपये व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पुन्हा प्र.मे.टन १२५ रुपये याप्रमाणे प्र.मे.टन ३ हजार ०५०रुपये सर्वाधिक दर दिला आहे.तर या व्यतिरिक्त मार्च महिन्यात गाळपास आलेल्या ऊसाला प्र.मे.टन ५० रुपये व एप्रिल महिन्यात ७५ रुपये प्र.मे.टन अनुदान दिले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली-भास्करराव धोर्डे,डोणगाव,पूर्व हंगामी-जमालभाई सय्यद,भरतपूर,सुरु-साहेबराव घुले,भरतपूर,खोडवा-मारुती केदार,बक्तरपूर या शेतक-यांचा समावेश होता.

  कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या प्रसंगी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम,ज्ञानदेव मांजरे,विश्वासराव आहेर,पद्माकांत कुदळे,चंद्रशेखर कुलकर्णी,कारभारी आगवण,काकासाहेब जावळे,वसंतराव दंडवते,बाबासाहेब कोते,नारायण मांजरे,आनंदराव चव्हाण,एम.टी.रोहमारे,राजेंद्र गिरमे,मुरलीधर थोरात,अॅड. शंतनू धोर्डे,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती,उपसभापती,सदस्य,नगरपालिकेचे सदस्य,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”देशाची साखर निर्यात धोरणांमध्ये अनिश्चितता आहे.२ वर्षापुर्वी ११० लाख मे.टन,त्यानंतर ६० लाख मे.टन साखर निर्यात करण्यात आली परंतु मागील वर्षात काहीच साखर निर्यात झाली नाही,त्यामुळे आंतरराष्ट्रीय साखर व्यापारात भारताची विश्वासार्हता कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. नुकताच केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध काढून टाकले आहे त्यामुळे ऊसाचा रस शुगर सिरप,बी हेवी मोलॅसेस इथेनॉल उत्पादनाकडे वळविता येईल हा निर्णय स्वागतार्ह असून त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.केंद्र शासनाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सहकारी साखर कारखान्यांनी ऊसाला एसएमपी/एफआरपी पेक्षा जादा अदा केलेल्या ऊस दराला केंद्र किंवा राज्य शासनाची अंतिम ऊस दर म्हणून मान्यता असल्यास व्यावसायिक खर्च म्हणून परिगणना करण्यास मान्यता दिली. त्याकरीता कायद्यात देखील बदल केला.प्राप्तीकर संदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या या महत्वपुर्ण निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.२०२३-२४ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रुपये ३ कोटी १३ लाख ८४ हजार इतका झालेला असून ३१ मार्च २०२४ अखेर एकूण संचित नफा २७ कोटी ३१ लाख असून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली सदर सूचनेस बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.यावेळी शॉट सर्किटमुळे ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी सभेचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले.यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले.उपस्थितांचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले आहे.

यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली- भास्करराव धोर्डे,डोणगाव, पूर्व हंगामी-जमालभाई सय्यद,भरतपूर,सुरु-साहेबराव घुले,भरतपूर,खोडवा-मारुती केदार,बक्तरपूर या शेतक-यांचा समावेश होता.

सदर प्रसंगी सभेचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले.यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले.उपस्थितांचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close