जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या साखर कारखान्याकडून दुसऱ्या हप्त्यापोटी रक्कम जमा-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या हफ्त्यापोटी रुपये १०० प्र.मे.टन याप्रमाणे ऊस दराचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 

“जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करून पेरणी करता यावी तसेच मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार मिळावा याकरिता ऊस बिलापोटी द्वितीय हप्ता रक्कम रुपये १००/- प्र.मे. टन देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  यावर्षी गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढत विक्रमी ८,४५,७३३ मे.टन ऊसाचे गाळप करून ९,५४,८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे व सरासरी साखर उतारा ११.२९ इतका राहिला आहे. साखर कारखान्याचे दोन टप्प्यात आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून चालू हंगामात यशस्वीरित्या ऊस गाळप हंगाम पूर्ण केला आहे.गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे त्यांना पहिली उचल प्र.मे.टन रुपये २,८२५/- याप्रमाणे यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे.

   जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करून पेरणी करता यावी तसेच मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार मिळावा याकरिता ऊस बिलापोटी द्वितीय हप्ता रक्कम रुपये १००/- प्र.मे. टन देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चौकट- आगामी गळीत हंगाम २०२४-२५ करिता शेतकऱ्यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे.चालू वर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे  त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कराव्या”-आ.आशुतोष काळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close