जाहिरात-9423439946
सहकार

…हि प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नका-पतसंस्थांना आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव  तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची क्रास प्रणाली वापरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे कर्ज वितरण करणार नसल्याचा ठराव एक मताने करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“राज्यातील चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण करून अडचणीत येणाऱ्या पतसंस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पतसंस्थांच्या कामकाजात काटेकोरपणा व नियमितता आणून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सहकारी पतसंस्था पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक तालुका फेडरेशन अंतर्गत करण्यात येत आहे-सुरेश वाबळे,अध्यक्ष,जिल्हा स्थैर्य निधी.


      महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन,अ.नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव आणि कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक विचार मंथन व प्रशिक्षण शिबिर स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्या वेळी ते बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे दिसत आहे.


     राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमालाअहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे,नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सदर प्रसंगी नामदेव ठोंबळ म्हणाले की,”विविध कर प्रणालीनुसार तालुक्यातील पतसंस्थांनी कामकाज करण्याचे अपेक्षा व्यक्त करत सहकार खात्याने घालून दिलेल्या नियमानुसार काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.तालुक्यातील सहकारी पतसंस्थांना कोपरगाव सहकारी संस्था कार्यालय सहकार्य व मार्गदर्शन करेल असे आश्वासन दिले आहे.तालुक्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींची ३ महिन्यातून एकदा आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

    या प्रसंगी राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे म्हणाले की,”सहकारी पतसंस्था मजबूत असेल,तर पतसंस्था फेडरेशन मजबूत बनते.त्यासाठी राज्य फेडरेशन अ.नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात आढावा बैठका,विचार मंथन शिबीरे आयोजित करून पतसंस्था मजबूत बनवण्याचं काम करत आहे.या साठी राज्य फेडरेशनला अ.नगर जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.तसेच कोपरगाव तालुक्यातील ज्या सहकारी पतसंस्था राज्य फेडरेशन व तालुका फेडरेशन च्या सभासद नसेल त्यांना सभासद होण्याचे आवाहन वासुदेव काळे यांनी केले आहे.


    दरम्यान सदर प्रसंगी जिल्हा स्थैर्य निधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी,”राज्यातील चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण करून अडचणीत येणाऱ्या पतसंस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पतसंस्थांच्या कामकाजात काटेकोरपणा व नियमितता आणून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सहकारी पतसंस्था पारदर्शक बनविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील प्रत्येक तालुका फेडरेशन अंतर्गत करण्यात येत आहे. तसेच या मुळे चुकीचे काम करणाऱ्या अपप्रवृत्तींना ही आळा बसणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.
    नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा,व्याख्याते दत्तात्रय खेमनर,कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका फेडरेशन संचालक राजेंद्र देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ यांनी विशेष परिश्रम घेतले.या आढावा बैठक,विचार मंथन व प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील ६० पतसंस्थांचे २०० च्या वर प्रतिनिधी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close