सहकार
…या पतसंस्थेच्या ग्राहकांनी लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे कर्मचारी यांच्याबरोबरच परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करणाऱ्या पद्मविभूषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सेवेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला असून ग्राहकांनी या लॉकर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सेफ डिपॉझिट लॉकर हे भाड्याने दिलेले लॉकर असते,जे बँक तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी देते.मौल्यवान दागिने,रत्ने,आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्रे,विमा पॉलिसी,ओळखीचा पुरावा,इतर गोपनीय आणि वैयक्तिक वस्तू ठेवल्या जाऊ शकतात.अशा सुविधांची आता ग्रामीण भागात मागणी वाढली हि गरज ओळखून शरद पवार सहकारी पतसंस्थेने हि सुविधा नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरु केली आहे.त्याचे सभासद आणि ठेवीदार आदींनी स्वागत केले आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन यावेळी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,उपाध्यक्ष रावसाहेब चौधरी,संचालक अनिल महाले,सुदाम वाबळे,व्यंकटेश बारहाते,महेन्द्र काळे,वीरेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर हाळनोर,तालिब सय्यद,चंद्रशेखर कडवे, भाऊसाहेब लुटे,रविंद्र निकम,व्यवस्थापक मंगेश देशमुख,त्यांचे सहकारी तसेच ठेवीदार,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना म्हणाले की,”माजी खा.शंकरराव काळे सहकारी संस्थांच्या बाबतीत नेहमीच म्हणत असत की,”सहकारी संस्था हे काचेचे भांडे असते.त्यामुळे सहकारी संस्था चालवतांना या काचेच्या भांड्याला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घ्यायची असते.त्यांनी साखर कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करतांना अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. त्यापैकी हि एक पतसंस्था असून त्यांच्या विचारांवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.संस्थेने लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शक्य असणाऱ्या सर्व सुविधा ग्राहकांना द्याव्यात अशा सूचना आ.काळे यांनी शेवटी संचालक मंडळाला दिल्या आहे.