शैक्षणिक
मयत मुलीच्या पालकांस महाविद्यालयाकडून धनादेश सुपूर्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थीनी कु.प्रगती मधुकर होन हिचे गत महिन्यात ऑटो रिक्शा व कंटेनरच्या भीषण अपघातात निधन झाले होते त्याबाबत महाविद्यालयाने विद्यापीठामार्फत पाठविलेला प्रस्ताव दि.ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड या विमा कंपनीने मंजूर केला असून पालकांना एक लाखांचा धनादेश नुकताच सुपूर्त केला आहे.
सोमैय्या महाविद्यालयाची द्वितीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेली चांदेकसारे येथील विद्यार्थीनी प्रगती ही बस संप काळात नेहमीप्रमाणे सकाळी महाविदयालयात येत असतांना तीचे डाऊच खुर्द या ठिकाणी कंटेनरने दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले होते.त्या बाबत हा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
सोमैय्या महाविद्यालयाची द्वितीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेली चांदेकसारे येथील विद्यार्थीनी प्रगती ही बस संप काळात नेहमीप्रमाणे सकाळी महाविदयालयात येत असतांना तीचे डाऊच खुर्द या ठिकाणी कंटेनरने दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले होते.सदर बाब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ विभागास महाविद्यालयातर्फे कळविण्यात आली होती.
या विमा कंपनी कडून मंजूर झाालेला एक लाख रुपयाचा धनादेश संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते मयत विद्यार्थीनीचे वडील मधुकर होन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी धनादेश वितरण करतेवेळी सिनेट सदस्य प्रो.के.एल.गिरमकर,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय दवंगे,प्रबंधक डॉ.अभिजीत नाईकवाडे,आबासाहेब कोकाटे, संजय पाचोरे,अविनाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.