समाजकल्याण विभाग
दिव्यांग शिष्यवृत्ती अर्ज करण्यास अखेर मुदतवाढ
न्यूजसेवा
अ.नगर-(प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची १५ जानेवारी २०२३ अखेर संस्था स्तरावर व ३१ जानेवारी २०२३ अखेर नोडल अधिकारी स्तरावर पडताळणी करण्यात येणार आहे. अशी माहिती ही श्री. देवढे यांनी शेवटी दिली आहे.