सण-उत्सव
महेश्वर यात्रा महोत्सवास प्रारंभ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला असून माजी आ. अशोक काळे,आ.आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आ.आशुतोष काळे यांनी खांद्यावर कावड घेवून कावड यात्रेत सहभागी झाले.
“या वर्षी यात्रेत गर्दीचा उंचांक होणार असून मोठी आर्थिक उलाढाल होणार असून यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा कमिटीच्या वतीने संपूर्ण परिसरावर तिसरा डोळा अर्थात चलचित्रण यंत्रणेची नजर असणार आहे.यात्रेकरूंनी सदर यात्रा उत्सव शांततेत साजरा करावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ.
याप्रसंगी अभिषेक काळे,डॉ.मेघना देशमुख,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,वाल्मिक कोळपे,आदींसह यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात कोरोना संकट असल्यामुळे दोन वर्ष यात्रोत्सव झाला नाही मात्र श्री महेश्वर महाराजांच्या कृपेने हे संकट दूर झाले असून मागील वर्षापासून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव पुन्हा मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे.यावर्षी देखील यात्रा कमिटीने नागरिकांसाठी विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सध्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून ऊस तोडणी मजुरांची देखील श्री महेश्वर महाराजांवर मोठी श्रद्धा आहे.त्यामुळे याहीवर्षी यात्रेत गर्दीचा उंचांक होणार असून मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा कमिटीच्या वतीने संपूर्ण परिसरावर तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याबद्दल आ.काळे यांनी समाधान व्यक्त करून शांततेत यात्रा उत्सव साजरा करावा असे आवाहन करून सर्वाना नवववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.