सण-उत्सव
कोपरगाव तालुक्यात…या गावात दीपोत्सव संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री क्षेत्र कुंभारी येथील राघवेशवर नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई राघवेशवर प्रतिष्ठानच्या वतीने राघवेशवर मंदिरात १ हजार ५०० पणत्या पेटवून महाआरतीसह दीपोत्सव साजरा केला असल्याची माहिती कुंभारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले.तो याच दिवसात.पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते.प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो.त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.पावसाळ्यातील समृद्धीच्या,आनंद उत्सवाचा,कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो.श्री क्षेत्र कुंभारी येथेही तो नुकताच उत्साहाट्स संपन्न झाला आहे.
या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात,घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.मात्र मोदी सरकारच्या काळात शरयू नदी काठी दीपोत्सव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे.त्याचे अनुकरण आता ग्रामीण भागातील देवस्थाने करू लागली आहेत.असाच दीपोत्सव नुकताच कुंभारी येथे श्री क्षेत्र कुंभारी येथे राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यांची संकल्पना माजी सरपंच प्रशांत घुले यांना सुचली असून त्यांनी ती आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वास्तवात उतरवली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेली १३ वर्षे पासून श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाणच्या वतीने रामनवमीला कुंभारी ते शिर्डी पायी पालखी सोहळा चालू केला आहे.साई पालखी भंडारा,दर वर्षी सर्व रोग निदान शिबिर,रक्तदान शिबिर,वूक्षारोपण,सारखे सामाजिक उपक्रम सुरु केले आहे.
या आनंदोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले,उपाध्यक्ष वाल्मीक निळकंठ व सर्व सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव घुले,कुंभार ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ,वसंत घुले,ग्रामस्थ दिलीप ठाणगे,नितीन घुले,अशोक निळकंठ,राजेंद्र निळकंठ,सोमनाथ निळकंठ,संदीप निळकंठ,संतोष कदम,बापूसाहेब चव्हाण,विजय खैरनार, संतोष कदम,भाऊसाहेब पवार,अभिजीत चकोर,भाऊसाहेब घुले,एस.डी.जाधव,इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य अतुल निळकंठ सर,लक्ष्मण साबळे,भाऊराव बर्डे,मिराबाई पवार,तरुण मंडळ महिला भगिनी ग्रामस्थ सहपत्नीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाचा व महाआरतीचा लाभ घेतला आहे.