सण-उत्सव
कोपरगावात… या बँकेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पिपल्स बँकेमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात व आनंदाच्या वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला आहे.सदर प्रसंगी ध्वजारोहण बँकेचे विद्यमान संचालक सुनिल कंगले व सुनिल बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कोपरगाव पीपल्स बँकेने ध्वजारोहणाच्या नंतर बँकेने सामाजिक बांधीलकी जपत पंचक्रोशीतील विविध शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केली,तसेच इयत्ता दहावी, बारावी,पदवी व इतर विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे.पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव पिपल्स सहकारी बँके येथेही हा उत्साह पाहायला मिळायला आहे.
सदर प्रसंगी बँकेच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिलेदार,ज्येष्ठ संचालक कैलास ठोळे,सुनिल दत्तात्रय कंगले,कल्पेश जयंतीलाल शहा,सुनिल बंब,हेमंत बोरावके,धरमकुमार बागरेचा,गौतम बँकेचे संचालक सुनिल शिलेदार,सेवक संचालक विरेश पैठणकर,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे,वरिष्ठ अधिकारी विठ्ठल रोठे,बँकेचे सर्व सेवक वर्ग,विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर प्रसंगी बँकेच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिलेदार व ज्येष्ठ संचालक कैलासचंद भागचंद ठोळे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक महाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार गोर्डे व गवांदे मॅडम यांनी मानले आहे.