सण-उत्सव
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत सत्य व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
इ.स.१९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.इ.स.१९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.
इ.स.२०१२ मध्ये,”द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.त्यांची जयंती नुकतीच कोपरगावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.श्री.गो.विदयालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,संदीप अजमेरे आदिनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांना अभिवादन केले आहे.या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,यु.एस.रायतेताई,बी.सी.उल्हारे,बी.बी.कुळधरण,ऐ.बी.अमृतकर,डी.पी.कुडके,जाधव ई.एल,ए.जे.कोताडे,एस.एन.शिरसाळे,वाय.के.गवळे आदी शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.या वेळी विदयालयाचे विदयार्थी कु.निदा मन्सुरी,मुबतशिर मन्सुरी,कु.आरती म्हस्के,रिध्दी चव्हाण,आरती चव्हाण यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना विषयी माहीती स्पष्ट केली तर सार्थक वाघ याने भगवान महावीर यांचे विचार स्पष्ट केले.विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.उपमुख्याध्यापक गायकवाड आर.बी.यांनी आभार मानले.