सण-उत्सव
..या गावात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यालयाच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते.ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते.डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला.डॉ.आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत.आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.त्यांची जयंती लोहगावसह देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.कोरोनाचा धोका लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने योग्य अंतर व काळजी घेऊन साजरी करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे,शांताराम चेचरे,सतिश गिरमे, रावसाहेब चेचरे,संजय सुरडकर,बाबासाहेब चेचरे,गंगाधर पारखे,गणेश गायकवाड,सुरेश शेलार सावंत व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.