सण-उत्सव
बाभळेश्वर येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने घटनाकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.या प्रसंगी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पासून सुरक्षित रहाणे बाबत मोलाचे मार्गदर्शन केले आहे.तसेच डॉ.आंबेडकर यांनी सांगितलेले तत्वज्ञान सर्वानी अंगिकारावे असेही या वेळी ते म्हणाले.
या वेळी जेष्ठ वकील भास्कर पठारे राहात्याचे कृषी सहाय्यक संदीप गायकवाड,पोलीस हवालदार मनोज सनांसे,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बनसोडे,सतीश गोंडे, संजय रोकडे,दीपक म्हसे, शरद तांबे,अशोक थोरात, बाबासाहेब हारदे, केशव बेंद्रे,योगेश बेंद्रे, महेश बेंद्रे,अजित ब्राम्हणे,राजू भालेराव,बापू भोसले, राहुल हुंडेकरी,राजू शेख,सचिन माघाडे,पिनू बागुल आदी मान्यवर हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे यांनी केले