सण-उत्सव
कोपरगावातील..या ठिकाणचा महाशिवरात्री उत्सव भक्ताविना संपन्न !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नजीक असलेल्या कोपरगाव बेट येथील संत जनार्दन स्वामी मंदिर व कोपरगाव बेट येथील शुक्राचार्य मंदिर आदी ठिकाणी संपन्न होणारा “महाशिवरात्री उत्सव” यंदा कोरोनाची साथ वाढत असल्याने प्रशासनाने गर्दीचे उत्सव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने भक्ताविना संपन्न करण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.दरम्यान श्री काशी विश्वेश्वर मंदिरात महंत रमेशगिरी महाराज यांच्या तर शुक्राचार्य मंदिर येथे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले आहे.
कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी मंदिर परिसर व गुरु शुक्राचार्य मंदिर आदी परिसरात हा उत्सव निवडक पुजारी व प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पाडला आहे.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.यंदा तो दि.११ मार्च रोजी संपन्न झाला आहे.कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी मंदिर परिसर व गुरु शुक्राचार्य मंदिर आदी परिसरात हा उत्सव निवडक पुजारी व प्रशासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पाडला आहे.
कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.त्यानीच आपल्या हयातीत स्थापन केलेले श्री काशीविश्वानाथ मंदिर आहे.तर दुसरे ठिकाण प्राचीन असून या ठिकाणी कच व देवयानी यांची प्रेमकहाणी फळली-फुलली असल्याचे प्राचीन साहित्यात उल्लेख सापडतात.माणसांना जिवंत करणाऱ्या संजीवनी विद्येचे उगमस्थान मानले जाते.आजही या ठिकाणी संजीवनी पार आहे.या ठिकाणाला मोठे अध्यात्मिक महत्व असून या ठिकाणी प्राचीन काळापासून दर वर्षी शिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते.अलीकडील काही वर्ष या यात्रेला उतरती कळा लागली होती मात्र ट्रस्टने मात्र या प्रश्नी लक्ष घातले असून या उत्सव आता मात्र शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे अवधीत चालला आहे.मात्र या वर्षी कोरोनाने कहर केलेला असल्याने या वर्षीही गत वर्षी सारखेच कोरोनाचे सावट उत्सवावर आहे.त्या मुले राज्यातील सर्व तीर्थ क्षेत्रे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याला कोपरगावही त्याला अपवाद नाही.त्यामुळे नुकतीच शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून हि बाब आधीच स्पष्ट केली होती.त्यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी हा उत्सव भाविकांना बंद करण्यात आला असल्याची माहिती देऊन या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन मंदिर प्रशासनाचे वतीने केले होते.त्यामुळे तालुक्यात श्री क्षेत्र मंजूर,श्री क्षेत्र कुंभारी आदी ठिकाणीही हीच स्थिती होती.त्यामुळे शिव भगवान यांना भक्ताविना या वर्षी ताटकळावे लागले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले आहे.