जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेचा शाळांत परीक्षा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिशचा एस.एस.सी.परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ९२.५० एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ०७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,१० प्रथम श्रेणी,०९ द्वितीय श्रेणी,तर ११ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळविली आहे.

   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल आज,मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यामध्ये ०७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,१० प्रथम श्रेणी,०९ द्वितीय श्रेणी,तर ११ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळविली आहे.विद्यालयात सर्वाधिक ८६.००% गुण मिळवून कु.इच्छा भाऊसाहेब सोनवणे प्रथम आली आहे.तर साहिल गोरख एलमामे या विद्यार्थ्याने ८१.२० गुण मिळवून द्वितीय व आदित्य धनराज सोनवणे या विद्यार्थ्याने ७९.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

   कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड,सचिव चैताली काळे,संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, सर्व पालक,ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close