सण-उत्सव
…या गावी ऋषीभोजन कार्यक्रम होणार !

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षीही बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता श्री शृंगेश्वर महाराज मंदिराजवळ ऋषिभोजन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून याप्रसंगी भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

संत श्री जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील संतमंडळी तसेच भजनी मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.संवत्सर येथे रामायण काळापासून ऋषीभोजनाची परंपरा सुरु आहे.ऋषींना भोजन दिल्यानंतर पाऊस पडतो अशी आख्यायिका असल्याने हा सोहळा संवत्सरकरांसाठी मोठी पर्वणी असते.मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व भावीक उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडतात व महाप्रसादाचा लाभ घेतात.यावर्षीही हा सोहळा बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
याच दिवशी संवत्सर येथील श्री शनी महाराज मंदिराच्या प्रागणात अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ होणार असून सात दिवस हा सोहळा सुरु राहील या सप्ताहाचा प्रारंभ परमपूज्य ह.भ.प. भानुदास महाराज बोलकीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.या सप्ताहकाळात अनेक किर्तनकारांची किर्तने व प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत.पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळे देखील सप्ताहात सहभागी होऊन आपली सेवा प्रदान करणार आहेत. भाविकांनी या दोन्हीही कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहनही संवत्सर ग्रामस्थांनी केले शेवटी आहे.