जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

‘सिंगिंग स्टार ऑफ ….’ स्पर्धा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आहेत.

‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ स्पर्धेत आपली गायन कला सादर करतांना स्पर्धक.

“कलाकारांचा उत्साह,त्यांच्यातील कला पाहून हे भविष्यात हे चांगले कलाकार होतील.त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेवून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्यास संगीत क्षेत्रात देखील कोपरगावचे नाव मोठे झाल्याशिवाय राहणार नाही”-पुष्पाताई काळे,अध्यक्षा,प्रियदर्शनी महिला मंडळ.


  कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सव कार्यक्रमात यावर्षी विविध स्पर्धांबरोबरच नव्याने ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता कोपरगावमध्ये देखील प्रतिभा संपन्न कलाकार आहेत याची प्रचीती आली.स्पर्धकांनी सादर केलेली एकापेक्षा एक सरस बहारदार नवी,जुनी मराठी व हिंदी गाणी आपल्या अद्भुत ऊर्जेने सादर करणारे कलाकार व प्रत्येक गाण्याला उपस्थित रसिकांच्या प्रतिसादामुळे नियोजित दोन तासाची असणारी हि स्पर्धा तब्बल पाच तास घ्यावी लागली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  

यावेळी स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांचे पुष्पाताई काळे यांनी कौतुक केले आहे.त्या म्हणाल्या की,”कलाकारांचा उत्साह, त्यांच्यातील कला पाहून हे भविष्यात हे चांगले कलाकार होतील.त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेवून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्यास संगीत क्षेत्रात देखील कोपरगावचे नाव मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ हि स्पर्धा आयोजित करून गायन क्षेत्रातील हिरे शोधले आहे.यापुढे देखील अशा विविध स्पर्धा राबवून अशा कलाकारांसाठी व्यासपीठ उललब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close