जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

श्रध्देने आराधना करणे म्हणजेच उपासना होय-…या महाराजांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

शिर्डी ( प्रतिनिधी)


ज्ञान-विज्ञान याचा समन्वय घालून श्रद्धने मनापासून आराधना करणे म्हणजेच उपासना होय.जगात ज्ञान हे शुद्ध-पवित्र असे आहे.खरे ज्ञान आत्मिक शक्तीत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी नुकतेच जवळके येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“योगी,महायोगी,जपी,तपी,ज्ञानी संन्यासी,संत,महात्मे यांनाही सहजासहजी ईश्वर शक्तीचे आकलन होत नाही.त्यासाठी रात्रंदिवस उपासना,अखंड ध्यानधारणा करावी लागते.तेव्हा कुठे ईश्वरी शक्तीचे आकलन होते”- संजय महाराज जगताप.

कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री कै.ग.भा. गंगुबाई जयराम जवरे पा.यांच्या दशक्रिया विधी निमित्त आयोजित जवळके तालुका कोपरगाव येथील प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.

स्व.गंगुबाई जयराम जवरे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की,”माय बापाची सेवा ही सर्वात श्रेष्ठ व महत्त्वाची सेवा आहे.संत पुंडलिकांनीही आपल्या मातापित्यांची मोठी सेवा केली.स्वतः पांडुरंग पुंडलिकेच्या भेटीला आले.मात्र तरीही आपली आई वडिलांची पूजा संत पुंडलिकाने सोडली नाही.उलट पांडुरंगाला विटेवर उभे राहण्यास भाग पाडले अशी माता-पित्यांची सेवा ही मोठी भक्ती शक्ती आहे असे सांगत ही सर्व सृष्टी भगवंताची आहे.भगवंताच्या इच्छेनेच सर्व काही या विश्वात चालते अशा या विश्वामध्ये प्रत्येकाचे कर्म हे श्रेष्ठ आहे.कर्म हे सात्विक, राजस,तामस असे वेगवेगळे प्रकारचे असतात. त्याप्रमाणेच त्यास फळ मिळत असते.म्हणूनच चांगले कर्म या जीवनात करत राहावे. संत,महात्मे यांनीही ते सांगितले आहे.विविध संतांचे हजारो अभंग आहेत.ज्याला भंग नाही ते अभंग असतात.संत महात्मे यांनी लिहिलेल्या सर्वच अभंगाचा एकच असा भाव आहे व तो म्हणजे सर्वसामान्य जीवाला या ईश्वरी शक्तीचा बोध व्हावा.या विश्वामध्ये भगवंताचे अधिष्ठान मूळ स्वरूप एक आहे.मात्र भगवंताचे अनेक अवतार आहेत.आदिशक्ती तसेच शंकराचे विविध अवतार या विश्वात आहेत.मात्र त्यांचे सर्वसामान्य प्राणी मात्राला सहसा आकलन होत नाही.योगी,महायोगी,जपी,तपी,ज्ञानी संन्यासी,संत,महात्मे यांनाही सहजासहजी ईश्वर शक्तीचे आकलन होत नाही.त्यासाठी रात्रंदिवस उपासना,अखंड ध्यानधारणा करावी लागते.तेव्हा कुठे ईश्वरी शक्तीचे आकलन होते. मात्र माता पित्याची सेवा मनोभावे केली तर व त्यांच्यातच ईश्वरी शक्ती पाहिली तर या शक्तीचे आकलन लवकर झाल्याशिवाय राहत नाही. माय बापाच्या रूपातच ईश्वरी शक्ती दिसते व तिथूनच सर्व ज्ञान प्राप्ती होते.असे सांगत कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे.त्यामुळे हाताने चांगले कर्म करावे डोळ्यांनी चांगले व्हावे,चांगले विचार, चांगले आचार,चांगले वाचन,चांगले मनन हेच प्रत्येकाचे चांगले कर्म आहे.भगवंताला ही स्वकर्म व चांगले कर्म आवडते.असे चांगले कर्म करण्यासाठी आपला भारत देश मोठा  आहे.कारण जगात भारताचीच संस्कृती महान आहे.येथे चांगल्या आचार विचारांची देवाण-घेवाण करता येते.संतांनीही प्रातःकालीन भजन करा,ब्रह्म मुर्तावर काकडा, अभंग गाऊन उपासना करा.असा आपल्या वाणीतून,अभंगातून संदेश दिला आहे.त्याचे आपण आचरण केले तर नक्कीच आपल्याला असणाऱ्या मर्यादित ज्ञानात आणखी  भर पडेल व संतांप्रमाणे संपूर्ण ज्ञान मिळणे सोपे होईल असे सांगत कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी केली.त्या निमित्ताने आपण इंद्राची,चंद्राची, महा शक्तीची पूजा केली.महालक्ष्मीची आराधना केली.पण महालक्ष्मी आपल्याला पाहत  असते कोण जागृती! म्हणजे कोण ध्यान अवस्थेत जागा आहे व कोण अज्ञान अवस्थेने झोपलेला आहे.कोजागिरी पौर्णिमेला या अज्ञान अवस्थेतून ध्यान अवस्थेत,ज्ञान अवस्थेत येण्याची गरज आहे.त्यासाठी संत महात्मे आणि भगवंताची पूजा मनोभावे करणे जरुरी आहे.पूजा या कायिक,निर्गुण स्वरूपात तर वाचिक,मानसिक अशा प्रकारातही करता येतात.मात्र मनोभावे पूजा केली तर चांगले कर्म केले तर नक्कीच ईश्वरी शक्तीचे ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही व तेव्हापासून आत्मिक आनंद, समाधान नक्कीच मिळत असते.असे अनेक उदाहरणे दाखले देत त्यांनी यावेळी निरूपण केले. व
आज पोर्णिमा कोजागिरीचाही पर्वकाळ आहे. महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती आहे. भक्तीमती संत मीराबाई यांची जयंती आहे. असा त्रिवेणी संगम योग आजच्या या कोजागिरीच्या सकाळच्या प्रवचनाच्या सत्रात येथे घडून आलेला आहे.


  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीते मध्ये सांगतात की,यश श्याम जागृती भूताने सा निशा पश्यतोमुने,ज्यामध्ये जगत झोपलेले आहे.त्यामध्ये संत महापुरुष जागी असतात आणि ज्यामध्ये जगत झोपलेली आहे.त्यामध्ये महापुरुष स्थिर असतात.कोजागृती म्हणजे आजच्या या पर्व काळाला कोण जागा आहे व अज्ञानामध्ये कोण झोपलेला आहे. ज्ञानावस्थेमध्ये कोण जागृत आहे.आजच्या या दिवशी पृथ्वीतलावर लक्ष्मीमाता  या भूत प्राणी मात्रा विषयी जागरूक व जागृतीचा संदेश देत असताना कोण जागा आहे,हे पाहत असते.व चंद्र प्रकाशाच्या किरणामध्ये चंद्रामृत जो प्रसाद म्हणून सेवन  करतात.त्यांना आरोग्य प्राप्त होते व महालक्ष्मी चा त्यास आशीर्वाद मिळतो.असे सांगून कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व विषद केले आहे. वारकरी संप्रदायात कार्तिक स्नान परवणीला मोठे महत्त्व आहे.अशा संप्रदायामधील कार्तिक स्नानाची जी पर्वणी आहे.त्याचा प्रारंभ ही आज मितिला होत आहे . हा योग आहे.वारकरी संप्रदायातील संत मालिकेतील संत महापुरुषांनी भगवान पांडुरंग परमात्मा विष्णू स्वरूप असलेल्या भगवंताचे गुणगान अभंग वाङ्मयाद्वारे गायलेले आहे. त्यामध्ये विश्ववंदे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून थेट संतपरंपरा,संत शिरोमणी नामदेव महाराज,संत भानुदास महाराज,संत एकनाथ महाराज,संत तुकाराम महाराज, आदी करून सर्व संत महात्म्यांनी कार्तिक स्नान उत्सवाचे संपूर्ण अभंग गायलेले आहेत व भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन करून मनुष्यप्राणी मात्राला त्या माध्यमातून उपदेश केलेला आहे.
ते म्हणतात की,” उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा;भावे चरणी ठेवा माता सुखव्यता जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विश्वनाथ सर्व मित्र आहे जाणून शरणदिगा देवासी आशा!!
  या अभंग प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे याच्यावर मनुष्य प्राणी मात्राला ते उपदेश करतात.कार्तिक स्नानाचे अभंग प्रकरणांमध्ये वासुदेव आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी जागल्या भूपाळी अनेक प्रकारचे असे शेकडो अभंग आहेत.अशा अभंगातून आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये वारकरी संप्रदायाची उपासना भगवान पांडुरंग विठ्ठल परमात्मा, सकल संत,महात्म्यांनी भजनाच्या द्वारे अभंग गाऊन केलेली आहे.पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावर तीन ते सहा पहाटे असणारे ब्रह्म मुहूर्त या पर्वकाळावर कार्तिक स्नान उत्सवाचा पर्वकाळ महिनाभर चालतो.असा योग आज घडून आलेला आहे आणि महर्षी वाल्मिक ऋषी की ज्यांनी भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येण्याचे अगोदर भगवान प्रभू रामचंद्राचे नाम जप साधना करून नामस्मरणाच्या साधनेद्वारे त्रिकाल बाधित ज्ञान प्राप्त करून पुढे भविष्यात घडणारा प्रसंग त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या रूपाने सर्व विश्वाला दिला आणि देत असताना संपूर्ण भगवान प्रभू रामचंद्र अवतार कार्य सुरू करण्याच्या अगोदर दिलेला संदेश त्याचे तंतोतंत पालन भगवान प्रभू रामचंद्र यांनी केले. मग भगवान प्रभू रामचंद्र जन्माच्या अभंगांमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज बोलतात की, स्वतः भगवंताने वाल्मीक ऋषींची रामावतार कार्यात घालून दिलेली आचारसंहिता भगवान प्रभू रामचंद्राने आपल्या अवतार कार्यात संपूर्ण पाळली.म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की,”बोलीला वाल्मीक तैसेची करीन वर्तुने दाविन नामा म्हणे|| अशा महान महर्षी वाल्मिकांची आज जयंती आहे.तसेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनन्य उपासक असणाऱ्या संत मीराबाई म्हणतात की,”मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको ही,मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अनन्य भावाने एकरूप आहे.भगवान श्रीकृष्णाला सोडून अन्य उपासनेमध्ये मी रमत नाही.अशा भक्तीमती संत मीराबाई यांचीही आज जयंती आहे.असा हा पर्वकाळ कै.गंगुबाई जयराम जवरे यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी आलेला आहे. म्हणजेच कै.गंगुबाई जयराम जवरे या एक पुण्यवान अशा माता होत्या.त्यांनी धार्मिक व पुण्यांचे कार्य केले.म्हणूनच त्यांच्या पोटी ही सदाचारी,चांगले आचार,विचार असणारी व धार्मिक वृत्तीचे असे पुत्र जन्माला आले.असेही शेवटी ह.भ.प.संजयजी महाराज जगताप यांनी  सांगितले आहे.
प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी.तेच खरे मोठे पुण्य आहे.तीच खरी महान पूजा आहे असे सांगत पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री कै.ग.भा. गंगुबाई जयराम जवरे पा.यांना दशक्रिया विधी निमित्त त्यांनी शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
  सदर प्रसंगी ह.भ.प.भास्कर महाराज गव्हाणे,मच्छिंद्र महाराज खिलारी,निळवंडे कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,श्रीरंग चांदगुडे,सरपंच सारिका विजय थोरात,रमेश दिघे,सचिन मोमले,ग्रामस्थ,महिला,आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close