विशेष दिन
कोपरगावात,’जागतिक होमिओपॅथीक दिन’उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनच्या होमिपॅथीक महाविद्यालय येथे नुकताच,’जागतिक होमिओपॅथीक दिन” मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.
दि.१० एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक ‘फेडरिक सॅम्युअल हॅनेमन’ यांचा जन्म झाला होता.त्यामुळेच हा दिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्यामागचे एकमेव ध्येय म्हणजे लोकांना होमिओपॅथीची जाणीव करून देणे.आज जगातील सुमारे १०० देशांमध्ये होमिओपॅथीने रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान होमिओपॅथी पद्धतीमुळे कोणतीही हानी होत नसली तरी तिच्या औषधांची किंमतही फारशी नाही.क्लिष्ट ते गुंतागुंतीचे आजार होमिओपॅथीने मुळापासून नष्ट करता येतात.याबाबत या दिवशी जागृती करण्यात येते.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे हा दिन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनच्या होमिपॅथीक महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होमिपॅथीक तज्ञ डॉ.राजेंद्र श्रीमाळी,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल ॲनिमन व जनार्दन स्वामींच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ वाहून दीप प्रज्वलन करण्यात आले आहे.होमिपॅथीक्या विद्यार्थ्यांना होमिपॅथीक तज्ञ डॉ.राजेंद्र श्रीमाळी यांनी होमिपॅथीक विषयाचे महत्व मानवाच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे सखोल विश्लेषण करून सांगितले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिपॅथीक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सावनी यरनाळकर व डॉ.विद्यानंद आठवले लिखित सर्वसामान्यांसाठी होमिओपॅथीच्या सोप्या पद्धती (A BEACON LIGHT )
या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
सदर प्रसंगी यात मान्यवरांच्या हस्ते होमिपॅथीक विषयात दिग्गज व्यक्तींच्या छायाचित्रांचे उदघाटन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर होमिपॅथीचे जनक सॅम्युअल ॲनिमन यांची तस्मिया शेख,प्रतीक्षा तिडके,अनुष्का जाधव,संदीप लगड या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी रांगोळी काढली होती.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमिओपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना दोगडे,भक्ती आहेर तर उपस्थितांचे आभार प्रतीक्षा ठाकरे यांनी मानले आहे.