विशेष दिन
कोपरगाव…या बँकेत,’राष्ट्रीय शेतकरी दिन’ उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कोपरगाव शाखेच्या वतीने नुकताच ‘शेतकरी दिन’ मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना रेणुकामाता प्रतिमा व सन्मानपत्र,दिनदर्शिका देऊन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
“राष्ट्रीय शेतकरी दिन हा दि.२३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो.भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.ते शेतकऱ्यांचे मोठे तारणहार मानले जातात.सन-२००१ मध्ये चरणसिंह यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा करण्यात सुरुवात झाली होती.या दिनानिमित्त शेतकऱ्यांना रेणुकामाता प्रतिमा,सन्मानपत्र व दिनदर्शिका देऊन साजरा करण्यात आला आहे”-अनुराधा रणदिवे,व्यवस्थापक,रेणुकामाता मल्टीस्टेट बँक,कोपरगाव शाखा.
राष्ट्रीय शेतकरी दिन हा दि.२३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो.भारताचे पाचे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.ते शेतकऱ्यांचे मोठे तारणहार मानले जातात.सण-२००१ मध्ये चरणसिंह यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा करण्यात येतो.त्यासाठी देशभरात शेतकऱ्यांच्या हिताचे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.कोपरगाव येथील रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कोपरगाव शाखेच्या वतीने नुकताच ‘शेतकरी दिन’ मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित सभासद,ठेवीदार,कर्जदार आदींना सन्मानचिन्ह,दिनदर्शिका आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन तो उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी प्रसिद्ध कवी डॉ.दादासाहेब गलांडे,भास्कर नरोडे,छायाचित्रकार हेमचंद्र भवर,राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते रोहिदास होन,रावसाहेब थोरात,नानासाहेब थोरात,जाधव,शहा,कोपरगाव शाखेच्या व्यवस्थापक अनुराधा रणदिवे,अधिकारी अनिता सोनवणे व कर्मचारी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.