जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

माजी कृषीमंत्री पवारांमुळे देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनला-संदीप वर्पे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाचे माजी कृषी खा.शरद पवार यांनी देशाच्या कृषिमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी आपल्या देशाला अन्नधान्य आयात करावे लागत होते.मात्र कृषिमंत्री पदाची दायित्व हाती घेतले तेव्हापासून त्यांनी राबविलेल्या अनेक योजनांमुळे शेतकरी अर्थसंपन्न होऊन आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अन्नधान्य निर्यात करू लागला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आ.काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणून केलेली विकासकामे बिगर राजकीय नागरिकांपर्यंत पोहचविल्यास आपण प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना मात देऊ”-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.

देशाचे माजी कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,महिला शहराध्यक्ष प्रतिभा शिलेदार,युवती तालुकाध्यक्ष वैशाली साबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,राहुल रोहमारे,दिनार कुदळे,सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आ.काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणून केलेली विकासकामे बिगर राजकीय नागरिकांपर्यंत पोहचविल्यास आपण प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना मात देऊ.माजी कृषी मंत्री पवार यांनी आ.काळे यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली असून त्यांना कायम राज्य पातळीवर मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविरतपणे काम करावे.नेत्यांचे वाढदिवस हे प्रेरणा घेण्यासाठी असतात.वय वर्षे ८२ असतांना देखील पवार हे सातत्याने पक्षासाठी काम करीत आहे.आपण देखील यापुढे त्यांचा आदर्श घेऊन आ.काळे यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार करावा असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील गंगूले यांनी केले तर सूत्रसंचालन मंदार पहाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिनार कुदळे यांनीं मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close