विशेष दिन
…या शहरात ‘राष्ट्रीय एकता दौड’ ला प्रतिसाद

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन,३१ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाच्या निमित्ताने शिर्डी उपविभागीय कार्यालय व शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने आज सकाळी ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.शिर्डी नगरपरिषद प्रवेशद्वार येथून प्रारंभ झालेल्या या दौडचा शुभारंभ शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला आहे.
यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,सचिन चौगुले,रवी गोंदकर तसेच उपविभागीय कार्यालय व शिर्डी नगरपरिषद कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.डोईफोडे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ‘वंदेमातरम’ व ‘अमर रहे हुतात्मे’ या राष्ट्रप्रेमाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.या दौडमध्ये कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.