विशेष दिन
…या महाविद्यालयांत गुरु पौर्णिमा उत्सव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अण्णासाहेब लावरे सेवा संस्थेच्या शिवामृता महाविद्यालयांत गुरु पौर्णिमा उत्सव संस्थेचे संस्थापक शिवाजी लावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
हिंदू धर्मात गुरु पौर्णिमा या उत्सवास ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात कारण यादिवशी वेदव्यास या थोर ऋषीचा जन्म झाला होता.त्यांना हिंदू परंपरेतील सर्वात प्रभावशाली गुरू आणि गुरु-शिष्य व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की या दिवशी त्यांनी आपली प्रसिद्ध रचना ब्रह्मसूत्र लिहिले.त्यांचे शिष्य या दिवशी या सूत्रांचे पठण करतात आणि त्यांच्या कार्याबद्दलची श्रद्धा आणि आदर दर्शविण्यासाठी हा उत्सव संपन्न होत आहे.कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयातही हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भुजाडे,श्री देशमुख,याशिवाय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,उपस्थित होते.यावेळी पगारे यांनी गुरु पौर्णिमेचे उपस्थितांना महत्व विशद केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पिंपळे सर,परदेशी मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार जाधव यांनी मानले आहे.