विशेष दिन
…या महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी ध्वजारोहण सोसायटीचे सदस्य सुरेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आले आहे.

“भारताची राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे.राज्य घटना बनवताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ती जगातील सर्वोत्तम 28 देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास करून बनवलेली असल्याने ती सर्वोत्तम ठरत असल्याचे सांगून राज्यघटना कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार,मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी आहे” डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य, के.जे.सोमैय्या महावदीयालय.
भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन नुकताच देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला होता.देशभरातील शाळा,महाविद्यालये,शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसुन आला आहे.कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,राजेश जाधव,कांतिलाल वक्ते,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब सोनवणे,माजी एन.सी.सी अधिकारी कॅप्टन डॉ.एन.आर.दळवी,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.बी.बी.भोसले,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एस.आर.पगारे ,कर्मचारी विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनीआपले मनोगत व्यक्त करताना,”भारताची राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे.राज्य घटना बनवताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ती जगातील सर्वोत्तम 28 देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास करून बनवलेली असल्याने ती सर्वोत्तम ठरत असल्याचे सांगून राज्यघटना कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार,मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्याचे सांगुन आपण सर्वांनी या संविधानाचे पालन करून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे असे नमूद केले आहे.
सदर प्रसंगी सुरेश शिंदे म्हणाले की,”भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या वीरांना अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे.भारतीय संविधानाची विस्तृत माहिती देतानांच विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्रहितासाठी सदैव कटिबद्ध असावे,सामाजिक जाणिवेच्या भावनेतून सामाजिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभागातील अनेक छात्र सैनिकांना त्यांनी मिळविलेल्या नैपुण्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व कलागुण सादर केले.प्रजासत्ताक दिनाच्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ.नितिन शिंदे,लेफ्टनंट वर्षा आहेर,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.शैलेंद्र बनसोडे,क्रीडा विभागप्रमुख डॉ.सुनिल कुटे,प्रा.मिलिंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.



