विशेष दिन
…या महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

“डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या संशोधक व्यक्तीचे विचार जागृत राहण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी वाचन हाच एकमेव उत्तम पर्याय आहे.वाचनानेच माणूस घडतो त्याला दिशा मिळते”-डॉ.यादव सर,प्राचार्य,एस.एन. डी.महाविद्यालय,येवला.
‘वाचन प्रेरणा दिन’ दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.या दिवशी विद्यार्थ्यांना आणि सर्वांना वाचनासाठी प्रेरित केले जाते,कारण डॉ.कलाम यांना वाचनाची आवड होती आणि त्यांना ज्ञान मिळवण्याची प्रचंड जिज्ञासा होती.हा दिवस वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी समर्पित आहे.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ येवला येथील एस.एन. डी.महाविद्यालयात हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.डी.एम.यादव यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तसेच प्राचार्य डॉ.यादव म्हणाले कि ,”डॉ.अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तीचे विचार जागृत राहण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी वाचन हाच एकमेव उत्तम पर्याय आहे.वाचनानेच माणूस घडतो त्याला दिशा मिळते.या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल जे.पी.नागरे,ए.डी दामले आदींनी प्रेरणादायी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ.रोकडे.डॉ.फरीद अहमद,डॉ.पवार,डॉ.राणे.डॉ.बोंबले,डॉ.निकम,प्रा.डाके, डॉ.अन्सारी,प्रा.साठे,प्रा.समुद्रे अधिष्ठाता प्रा.येवले व डॉ.भाने आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा.सावंत यांनी मानले आहे.