विशेष दिन
…या शहरात चालक दिन उत्साहात संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोशियन वतीने आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

दळणवळण आणि परिवहन क्षेत्रातील वाहनचालकांचे मोठे योगदान असते,जे या दिनाद्वारे अधोरेखित केले जाते.चालक दिनाचे औचित्य साधून वाहनचालकांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला जातो आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
चालक दिन हा १७ सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो,ज्यामध्ये वाहन चालकांच्या सुरक्षित प्रवासातील योगदानाची दखल घेतली जाते.या दिनानिमित्त वाहनचालकांचा आदर आणि सन्मान केला जातो,तसेच त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते.
वाहनचालक प्रवाशांना सुरक्षितपणे वाहतुकीची सुविधा देतात, याबद्दल त्यांचा आदर करणे हा चालक दिनाचा उद्देश आहे.दळणवळण आणि परिवहन क्षेत्रातील वाहनचालकांचे मोठे योगदान असते,जे या दिनाद्वारे अधोरेखित केले जाते.चालक दिनाचे औचित्य साधून वाहनचालकांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला जातो आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.अनेक ठिकाणी चालक दिन साजरा करण्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,ज्यात वाहनचालकांची आरोग्य शिबिरे रॅलीसह विविध कार्यक्रम साजरे केले जातात.कोपरगाव येथे हा चालक दिन मान्यवरांच्या उपस्थीतीत उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,राज्य महासंघ अध्यक्ष प्रकाश गवळी,वाहतूक निरीक्षक संदिप निमसे,महामार्ग निरीक्षक विक्रांत कचरे,सांगली येथील बाळासाहेब कलशेट्टी,कोल्हापूरचे केसरकर ‘नाशिक अध्यक्ष पी.एम.सैनी,अंजू सिंघल,विनायक वाघ,अमृत संजीवनी सहकारी वाहतूक संस्थेचे पराग संधान,पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,उद्योजक कैलास ठोळे,रिखब शेठ,अनिल काले,’बंब,वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी,सचिव शैलेश रावळ,वसीम भैय्या ‘उल्हास दोषी,राकेश बाकलीवाल,इकबाल ‘ अमोल शिरसाठ,सुनिल गीते,सचिन,पवन पांडे,भारत,बाबासाहेब सातुरे,संगमनेरचे शरिन,श्रीरामपूरचे विशाल त्रिवेदी,राहूरीचे रमजान शेख,वैजापूर श्री.मुळे,संभाजीनगरचे ईस्माईल भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी जेष्ठ चालकांचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.यावेळी महामार्गावरील चालकांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी आ.काळे यांनी चालक संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुब कच्छी यांनी केले तर सूत्रसंचालन सचिव शैलेश रावळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल शिरसाठ यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वितेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले आहे.