विशेष दिन
…या ठिकाणी ‘वैश्विक योग संमेलनचा योग’-परमानंद महाराज

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील योग गुरूंची पिढ्यान पिढ्यांची परंपरा पाहता राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या सहकार्याने गोदातीरावर ‘वैश्विक योग संमेलन’ भरविण्याचा योग पुन्हा एकदा जुळवून आणता येईल असा आशावाद आत्मा मालीक पिठाचे सद्गुरू परमानंद महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रम प्रसंगी केले आहे.

“माजी खा.लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६ ठिकाणी १ कोटी रुपयांचे योग भवन मंजूर करून त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.बांधण्यात आलेल्या वेगवेगळ्या वास्तूंचे संवर्धन व संगोपन करणे महत्त्वाचे असते ते पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे हे करू शकतात”-प्रशांत स.लोखंडे,श्रीरामपूर.
योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.हा योग दीन आज कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.
दरम्यान या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माजी खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील साईसिटी भागातील भाग्यनगर येथे उभारलेल्या आरोग्य मंदिर (योग भवन) लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
सदर प्रसंगी आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे प्रेमानंद गायकवाड महाराज,निजानंद महाराज,सार्थक आनंद महाराज,प्रेमानंद महाराज,प्रशांत लोखंडे,शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे,तालुका प्रमुख रावसाहेब थोरात,महिला तालुका प्रमुख मीनाक्षी वाकचौरे,शहर प्रमुख अक्षय जाधव,डॉ.विलास आचारी,डॉ.दत्तात्रय मुळे,डॉ.रमेश कोठारी,जेष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब,शिवसेना कार्यकर्ते अभिजीत आव्हाड,सुनील साळुंखे,महिला आघाडी शहर प्रमुख विजया थोट,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब,व्यापारी महासंघ संचालक महावीर सोनी,आशुतोष पटवर्धन समता महिला बचत गट अध्यक्ष सुहासिनी कोयटे आदींसह कोपरगाव परिसरातील योग प्रेमी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव शहर हे गोदाकाठावर वसलेले अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे.या परिसरात योग साधना करून आरोग्य सुदृढ बनविणाऱ्या अनेक पिढ्या आज ही बहुमोल योगदान देत आहे.त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून या परिसरातील आरोग्य मंदिर (योग भवन) सुशोभीकरण व व्यवस्थापनाची जबाबदारी समता चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारली आहे.हा परिसर कोपरगाव शहराचा केंद्रबिंदू होत असून प्रदूषण विरहित परिसर मानला जातो.ही वास्तू योग दिनानिमित्त कोपरगाव परिसरातील योग प्रेमींना अर्पण करत आहोत.
कोपरगाव परिसरातील योगासनामध्ये शहा कुटुंबातील तीन पिढ्या वर्षानुवर्ष कार्यरत असून शहा कुटुंबातील जेष्ठ योग प्रशिक्षक उत्तम भाई शहा यांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले तर योगासनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणाऱ्या विमल पुंडे यांना ‘योग सम्राज्ञी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
दरम्यान कोपरगाव परिसरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अभिजीत शहा,नितीन झंवर,दत्ता पुंडे,संतोष नलगे,अर्जुनराव दुबे,शशिकला लकारे,नानासाहेब गव्हाळे,सौरभ पुंडे,शिल्पा पुंडे,प्रज्वल ढाकणे,वैष्णवी ढाकणे आणि हास्य सम्राट चंदूलाल बजाज,योजना पोतदार आजींचा देखील जागतिक योग दिनानिमित्त सन्मान करण्यात आला आहे.दरम्यान आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ठोळे परिवाराच्यावतीने उद्योगपती राजेश ठोळे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी प्रशांत लोखंडे म्हणाले की,”माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६ ठिकाणी १ कोटी रुपयांचे योग भवन मंजूर करून त्यांचे बांधकाम करण्यात आले होते.बांधण्यात आलेल्या वेगवेगळ्या वास्तूंचे संवर्धन व संगोपन करणे महत्त्वाचे असते.एखाद्या बांधलेल्या वास्तूचे संवर्धन व संगोपन क्षमता परिवाराचे संस्थापक कोयटे करू शकत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचेआभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मानले आहे.