विशेष दिन
…या शहरात शिवजयंती उत्सव संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा.महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह मनोज नरोडे तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक,पूजन,आरती विधीवत संपन्न झाली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.कोपरगावसह महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.सर्वात आगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली.१८६९ मधे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला.जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती.परंतु २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उस्तव बंगालमधे जाउन पोहोचला.तो कोपरगाव शहरात झाला असल्यास नवल नाही.सदर प्रसंगी विधीवत पूजा झाल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमा प्रसंगी पहाटे वातावरण शिवमय झालेले होते.यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, माजी नगरसेवक संजय जगताप,मेहमूद शेख,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,अनिल दीक्षित यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी,नगरपरिषदेच्या माध्यमिक,प्राथमिक शाळांचे शिक्षक,शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई,धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती. याकरिता विद्युत अभियंता सागर रायकर,स्वप्नील जाधव व त्यांच्या टिमने विशेष परिश्रम घेतले.तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे,नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई,निलेश बुचकुले व भाऊराव राखपसरे यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.