जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

सत्तेपेक्षा जनसेवा महत्वाची -…यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे आदर्श जीवन जगले.त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करतांना कोणताही हेतू ठेवला नाही.कोणतीही अपेक्षा न करता केलेली सेवा हि जिव्हाळा असते आणि हाच जिव्हाळा त्यानी आयुष्यभर जपला असून त्यांचे जीवन भक्ती आणि कर्माचा संगम असल्याचे प्रतिपादन ज्ञानसिंधू ह.भ.प.संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर) यांनी केले आहे.

   सहकारातील अग्रणी नेते स्व.शंकरराव काळे यांची बारावी पुण्यतिथी आज सकाळी १०.३० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत आहे.

  

स्व.शंकरराव काळे हे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षण राज्यमंत्री होते.त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी १९९१-१९९६ या काळात कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक गणपतराव औताडे यांचे समवेत ते संस्थापक संचालक होते.

 

स्व.शंकरराव देवराम काळे (१९२१-२०१२) हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील अहील्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळ व सहकारी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते शिक्षण राज्यमंत्री होते.त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी १९९१-१९९६ या काळात कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक गणपतराव औताडे यांचे समवेत ते संस्थापक संचालक होते.या खेरीज त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे सलग पंधरा वर्ष अध्यक्ष पद भूषवले होते.सदर संस्थेशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले होते.त्यांची आज बारावी पुण्यतिथी होती.त्या निमित्त आज त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली आहे.त्या निमित्त हसेगावकर येथील ह.भ.प.संदीपान महाराज शिंदे यांचे सुश्राव्य हरी कीर्तन त्यांच्या गौतम नगर येथील स्मारका समोर आयोजित केले होते.

   सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष शंकर चव्हाण,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,संचालक दिनार कुदळे,संचालक राजेंद्र घुमरे,ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे,सुधाभाभी ठोले,युवक राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी सभापती वाल्मीक कोळपे,माजी सरपंच सचिन कोळपे,बाजार समितीचे संचालक संजय शिंदे,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवन,माजी नगरसेवक मंदार पहाडे,माजी गटनेते विरेन बोरावके,राहुल रोहमारे,नवाज कुरेशी आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सदर प्रसंगी संदीपान महाराज शिंदे यांनी स्व.शंकरराव काळे यांचे स्मृती भवन पाहून त्यांच्या कार्याचा गौरव केला असून भगवान कृष्णाच्या लीला सर्वांना ऐकवल्या आहेत.ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा स्मृतिदिन आल्याने आ.आशुतोष काळे यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.

प्रारंभी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव पंचायत समिती समोर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास व त्यानंतर गौतमनगर येथील पुतळ्यास अभिवादन केले आहे.त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close