जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…’या’ ठिकाणी शेतकरी दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर ( वार्ताहर )


   सहकार क्षेत्रातील कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती व ‘शेतकरी दिन’ संवत्सर ग्रामपंचायत व नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

 

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते.जगात शेतकरी नसेल तर मग आपल्या अस्तित्वाला काही किंमत किंवा अर्थ राहणार नाही.शेतकऱ्याने पिकविलेल्या धान्यामुळे, पिकामुळे आज आपल्याला जेवायला अन्न मिळते.हे कोणीही नाकारू शकत नाही.शेतकऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दिन साजरा करण्यात येतो.

  शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते.जगात शेतकरी नसेल तर मग आपल्या अस्तित्वाला काही किंमत किंवा अर्थ राहणार नाही.शेतकऱ्याने पिकविलेल्या धान्यामुळे, पिकामुळे आज आपल्याला जेवायला अन्न मिळते.हे कोणीही नाकारू शकत नाही.शेतकऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दीन साजरा करण्यात येतो.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले आहे.


   याप्रसंगी बोलताना राजेश परजणे म्हणाले की,पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करून सहकारी चळवळ सुरू करून शेतकऱ्यांच्या विकास योजना राबवण्याचे काम केले.त्यामुळे सहकार संस्थेस उत्तेजन मिळालेले आहे.शेतकरी दिनाचे महत्त्व विशद करताना श्री परजणे यांनी,” पद्मश्री विखे यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यातून सहकारी चळवळीत समाजाच्या प्रत्येक घटकाचा समावेश होईल हेच भावी विशाल सहकारी जगताचे स्वप्न साकार होईल आणि ते आज साकार झालेले आहे असेही परजणे शेवटी म्हणाले.

प्रसंगी संवत्सर गावच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,कृषी अधिकारी कुमारी कांबळे मॅडम,चंद्रकांत लोखंडे,दिलीप ढेपले,खंडू फेपाळे,सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे,लक्ष्मणराव साबळे, शिवाजीराव गायकवाड,अनिल आचारी,बाळासाहेब दहे, संदीप भोकरे,राजेंद्र निकम,शंकर परजणे,अविनाश गायकवाड,बाळासाहेब भोसले तसेच कृष्णा अहिरे ग्रामविकास अधिकारी,श्री प्राचार्य सदाफळ सर व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे दिलीप ढेपले यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close