विशेष दिन
…या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ग्रामपंचायतीस समोर व जिल्हा परिषद शाळेसमोर भारताचा 78 वां स्वातंत्र्य दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताने आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.हा दिवस १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘विकसित भारत’ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि भाषण करतात.या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते,संपूर्ण देश हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत त्याला अपवाद नव्हती.या ठिकाणी सकाळी शेतकरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची विविध घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन केले होते.त्यानंतर जवळके ग्रामपंचायत समोर निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे,जलसंपदा विभागाचे माजी उपभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य भाऊसाहेब कचरू थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,रावसाहेब थोरात,उपसरपंच सुनील थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,आण्णासाहेब भोसले,वाल्मीक थोरात,ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई नवनाथ शिंदे,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,ग्रामसेवक सतीश दिघे,संतोष थोरात,डॉ.सुनील शिंदे,जयराम वाकचौरे,अरुण थोरात,बाबासाहेब थोरात,शांताराम थोरात,विजय शिंदे,मुख्याध्यापक दत्तात्रय मैड गुरुजी,निवृत्ती बढे,सुधाकर आंबीलवादे,रवींद्र गोसावी,रुक्मिणी अंधारे,सुरेखा उगले,कोमल बागुल आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरम्यान जवळके येथील जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहन जवळके ग्रामपंचायत सदस्या रोहिणी रखमा वाकचौरे यांच्या हस्ते पार पडले असून सदर ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कार्यकर्ते अरुण भास्कर थोरात हे होते.त्यावेळी उपस्थित नागरिकांनी शाळेस,’ इंट्रॅक्टिव्ह बोर्ड’ साठी सुमारे एक लाख एक हजारांची देणगी दिली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यात काळे-कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून त्यात सहभाग नोंदवला आहे हे उल्लेखनीय आहे.तर जनमंगल ग्रामविकास संस्थेने अकरा हजारांची देणगी जाहीर केली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांनी केले आहे,उपस्थितांना मार्गदर्शन पत्रकार नानासाहेब जवरे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार रवींद्र गोसावी यांनी मानले आहे.