जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या ठिकाणी योगदिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथील स्थानिक के.जे.सोमैया  महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय योगा दिनाची सुरूवात २०१५ मध्ये सर्वात अगोदर झाली आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे.विशेष म्हणजे यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगा दिनाची संकल्पना जगासमोर ठेवली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय योगा दिनाची सुरूवात २०१५ मध्ये सर्वात अगोदर झालीये.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे.विशेष म्हणजे यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगा दिनाची संकल्पना जगासमोर ठेवली आहे.हा योग दिन के.जे.सोमैय्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
   सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे,शा.शि.संचालक डॉ.सुनिल कुटे,क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे,एन.सी.सी. प्रमुख डॉ.एन.जी.शिंदे,लेफ्टनंट प्रा.वर्षा आहेर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सदर योगदिनी ५७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.अ.नगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्याएन.सी.सी.,एन.एस.एस.,क्रिडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबिरात प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे यांनी योग,प्राणायाम व व्यायामाचे विविध प्रात्यक्षिके विद्यार्थांसमोर केली.
    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी योगाचे महत्त्व नमूद करतांना सांगितले कि ‘मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासनांचे मोलाचे स्थान असल्याचे शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close