विशेष दिन
महिलांच्या जीवनात पुरुषांचे महत्त्वाचे स्थान-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या कुटूंबाचा गाडा चालवताना महिलांच्या जीवनात पुरुषांचे महत्त्वाचे स्थान असून त्या शिवाय प्रपंच पूर्णत्वास जाणे कठीण असल्याचे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस.जे.एस रुग्णालयात शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी ‘महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर कार्यक्रमाला कोपरगाव लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा ठोळे,एस.जे.एस.रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ.विशाखा राठोड,एम.डी.मेडीसिन डॉ.सायली टोंमरे,स्त्रीरोगतज्ञ डॉ.स्नेहल भाकरे,नेत्ररोग तज्ञ डॉ.तेजस्विनी नाईकवाडे,पूजा कातकडे,बेबीताई कातकडे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”समाजात महिलांनी जीवन जगत असतांना आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या स्वतःची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे.आपण निरोगी राहिलो तर आपलं कुटुंब निरोगी राहील असे समजून घेणे महत्त्वाचे आहे.महिला सुशिक्षित होत आहे.त्याचबरोबर महिलांचे घटस्फोटाचे प्रमाण पण वाढत आहे.याला पुरुषच जबाबदार असतो असे नाही त्याला महिलाही कारणीभूत असतात.आपला कौटुंबिक वाद आपसात एकमेकांना समजून घेतले पाहिजे.जेव्हा दोघे पती पत्नी एकमेकांना समजून आपल्या आयुष्याचा प्रवास करतील तेव्हाच घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल असेही त्या शेवटी म्हणाल्या आहेत.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन मधील साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.
सदर प्रसंगीं फिजिओथेरपी मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या संजीवनी कोंडा,सोहेल शेख या विद्यार्थ्यांनी भरत नाट्य सादर केले होते.
यावेळी एस.जे.एस.रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ.विशाखा राठोड यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन एम.डी.मेडीसिन डॉ.सायली टोंमरे,यांनी केले तर उपस्थितांचे स्त्रीरोगतज्ञ डॉ.स्नेहल भाकरे यांनी आभार मानले आहे.
या कार्यक्रमास डॉ.मंजुषा गिडगे डॉ.अबोली, डॉ.तयब्बा यांचे विशेष सहकार्य लाभले.