विशेष दिन
…या पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न होत असून त्याची पूर्वतयारी राष्ट्रवादीच्या वतीने कोपरगावात झाली असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच विविध मनोरंजन कार्यक्रमाचा लाभ शहराती नागरिकांना मिळावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.कोपरगाव शहरात त्याची जय्यद तयारी राष्ट्रवाडी काँग्रेसच्या वतीने पूर्ण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हा उत्सव भव्य दिव्य स्वरुपात साजरा व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.यामध्ये अध्यक्षपदी सोमनाथ आढाव यांची निवड करण्यात आली आहे.कार्याध्यक्षपदी रविंद्र राऊत,योगेश नरोडे व मनोज नरोडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रहेमान कुरेशी,संतोष दळवी,राहुल शिरसाठ,राहुल चवंडके, विजय नागरे,शुभम लासुरे,सोमेश शिंदे,महेश उदावंत,शफीक शेख,शुभम जोशी,सचिवपदी तन्मय साबळे,चंद्रकांत धोत्रे,अजय आढाव,संकेत पारखे,बाळाजी देवकर,रविंद्र आहेर,आशुतोष देशमुख,अभिषेक कोकाटे,शिवाजी लकारे, आमिर पठाण,तन्मय साबळे,उमेश गोर्डे,चेतन आगळे यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व पदाधिकाऱ्यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आहे.