जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

..या ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या वतीने आज सकाळी ०८.१५ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन सरपंच सारिका विजय थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जलसंपदा विभागाचे माजी उपभियंता एस.के.थोरात यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी,लष्करी जवान,कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.तर आठवडे बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बाजारातील व्यापाऱ्यांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर,इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

  

सदर प्रसंगी सेवानिवृत्त लष्करी जवान तथा महावितरण कंपनींचे कनिष्ठ अभियंता संजय थोरात यांनी जिल्हा परिषद शाळेस वीस खुर्च्या तर उत्तमराव थोरात यांनी रोख रक्कम जाहीर केली आहेत.त्यांचे जवळके परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यावेळी जवळके येथे ध्वजारोहण जलसंपदा विभागाचे माजी उपअभियंता एस.के.थोरात यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिक व कनिष्ठ अभियंता संजय थोरात यांचे शुभहस्ते करण्यात आला आहे.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव थोरात हे होते.त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली असून रोख बक्षिसे दिले आहेत.तर महावितरण कंपनींचे कनिष्ठ अभियंता संजय थोरात यांनी शाळेस वीस खुर्च्या तर उत्तमराव थोरात यांनी रोख रक्कम जाहीर केली आहेत.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी सरपंच बंडू थोरात,बापूसाहेब थोरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांनी केले तर सूत्रसंचालन निवृत्ती बढे यांनी केले आहे.तर आभार माजी उपसरपंच अण्णासाहेब भोसले यांनी व्यक्त केले आहे.

  सदर प्रसंगी माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,उपसरपंच सुनील थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,दत्तात्रय थोरात,अण्णासाहेब भोसले,सदस्य भाऊसाहेब थोरात,वनिता रखमा वाकचौरे,संजय थोरात,विश्वनाथ थोरात,भिवराज शिंदे,रखमा वाकचौरे,सोपान जवरे,बाळासाहेब थोरात,बापूसाहेब थोरात,आप्पासाहेब थोरात,पोलीस पाटील सुधीर थोरात,तलाठी किशोर गटकळ,साईनाथ थोरात,संतु थोरात,साईनाथ थोरात,अरुण थोरात,राजेंद्र थोरात,एकनाथ थोरात,अशोक सरवार,डॉ.सुनील शिंदे,नवनाथ शिंदे,अशोक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर प्रसंगी उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी,लष्करी जवान,कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.तर आठवडे बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बाजारातील व्यापाऱ्यांचा सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close