विशेष दिन
…या महाविद्यालयात,’फार्मासिस्ट दिन’ उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगभरामध्ये जागतिक,’फार्मासिस्ट दिन’ हा दिवस २५ सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो तो कोपरगाव नजीक असलेल्या कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ‘फार्मसी’ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
जगभरामध्ये,’जागतिक फार्मासिस्ट दिन’हा दिवस २५ सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो.दरम्यान इस्तंबूल तुर्की येथे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (एफ.आई.पी) कॉंग्रेसने सन-२००९ मध्ये २५ सप्टेंबरला वार्षिक जागतिक फार्मासिस्ट दिन (डब्ल्यू.पी.डी.) म्हणून नियुक्त केले.देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज,कोकमठाण तो नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे हे होते.
सदर प्रसंगी गणेश वाणी,अविनाश जाधव,जितेंद्र गंगावळ,शामसुंदर डागा,नितीन दवंगे,प्रविण कदम,डागा,प्रविण गवळी रुपाली पाटील,सचिन आरुटकर,विजय जगताप,अनिल अहेरे,प्रशांत बोरावखे,रुतुल जाधव,दिगंबर गुरसाळ,सुरेश गुंड,दिपक,कोळपे,आरजेएस फाऊंडेशनचे सचिव प्रसाद कातकाडे,श्री कडू सर,प्राचार्य डॉ.नितीन पी. जैन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका फार्मसी संघटनेचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना ‘फार्मासिस्ट’ चे महत्व समजावून सांगितले आणि त्यांच्या सोबत असणारे कर्मचारी त्यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
तर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनीही नुकतेच प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या बी. व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत व एस.जे.एस.हॉस्पिटल मध्ये नवीन सुरु झालेल्या कॅन्सर सेन्टर बद्दल माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी,’फार्मा सप्ताहात’ भाग घेतलेल्या विजेते विद्यार्थ्यांना अथीतींच्या हस्ते पारितोषित वितरण करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनी केले तर अदिती शेवटे हिने सूत्रसंचालन केले आहे तर श्री कडू यांनी आभार मानले आहे.