जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या विद्यालयात.’जागतिक प्रथमोपचार दिन’ संपन्न    

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ९ सष्टेंबर हा दिवस,’जागतिक प्रथमोपचार दिन’ म्हणून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कोपरगाव येथिल डॉ.गोपालकृष्ण जगदाळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले.त्यांनी स्लाईड शो द्वारे प्रथमोपचार का व कसा करावा याची माहीती सांगितली.प्रथमोपचार अनेकांना जीवदान देवु शकत असल्याचे प्रतिपादन केले आहे.

अमूल्य मानवी जीव वाचवण्यामध्ये असलेले प्रथमोपचाराचे महत्त्व पटल्यामुळेच तर आज ‘प्रथमोपचाराची पेटी’ हा घरीदारी,कार्यालयात,वाहनात एक महत्त्वाचा भाग बनली आहे.जळणे,कापणे,जखम होणे,धक्का लागणे यांसारख्या अचानक झालेल्या दुखापतींवर वेळीच उपचार केला तर पुढची गंभीर आजार टळतात.म्हणून हा दिन उत्साहात साजरा केला जातो.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस’ आणि ‘रेड क्रिसेंट सोसायटीज’ या इंग्लंडमधील संस्थांतर्फे २००० साली ‘प्रथमोपचार दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू केली आहे.सर्वसामान्यांमध्ये प्रथमोपचारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या संस्थांच्या जगभरातील १०० शाखा सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी,विविध समारंभ आयोजित करत असतात.अमूल्य मानवी जीव वाचवण्यामध्ये असलेले प्रथमोपचाराचे महत्त्व पटल्यामुळेच तर आज ‘प्रथमोपचाराची पेटी’ हा घरीदारी,कार्यालयात,वाहनात एक महत्त्वाचा भाग बनली आहे.जळणे,कापणे,जखम होणे,धक्का लागणे यांसारख्या अचानक झालेल्या दुखापतींवर वेळीच उपचार केला तर पुढची गंभीर आजार टळतात.म्हणून हा दिन उत्साहात साजरा केला जातो.तो कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दरम्यान यात चक्कर येऊन खाली पडणे,बेशुद्ध होणे,मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे,मोठ्या प्रमाणात भाजणे,विजेचा धक्का,झटके येणे,पाण्यात बुडणे,साप,विंचू,मधमाशी चावणे,आगीच्या धुरामुळे गुदमरणे ,चोकअप मुळे श्वास रोखणे,उष्माघात,हिमस्खलनात अडकणे इत्यादी जोखमीच्या प्रसंगी आपण त्वरित  प्रथमोपचार देणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.यासाठी  जीवरक्षक प्रणाली कशी वापरावी हे स्पष्ट करुन यावेळी काय करावे आणि काय करू नये हे महत्त्वाचे आहे या बाबत डॉ.जगदाळे यांनी माहीती दिली आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले आहे.या प्रसंगी पर्यवेक्षिका उमा रायते,अनिल काले,सुरेश गोरे,आदि शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close