विशेष दिन
…या महाविद्यालयात,’शिक्षक दिन’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे,के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे,’ शिक्षक दिन’मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

डॉ.राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते.ते एक विद्वान,तत्त्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कारदेखील देण्यात आला होता.त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिन देशभर साजरा करण्यात येतो.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते.५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी,तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ.राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते.ते एक विद्वान,तत्त्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कारदेखील देण्यात आला होता.त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिन देशभर साजरा करण्यात येतो.तो कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण बारे हे होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षक दिनाचे औचित्य साधत नवोदित शिक्षकांनी आपले शिक्षक बनण्याची स्वप्न साकार केले.यामध्ये वैभव सापनर,गोकर्ण वाघ,कोकाटे नमन,अवधूत गाडे,धनराव सिद्धेश,बरकले अभिजीत,मयूर सरोदे, जाधव संदेश,युवराज गाडे,धनराव अभिषेक,वाघ प्रतीक,कु.जगताप कावेरी,शिंदे अश्विनी,आढाव साक्षी,आहेर विद्या,श्रेया नाजगड,श्रुती आढाव,पायल मांजरे,बोडखे वैष्णवी,सानप ऋतुजा,चांदगुडे सृष्टी,श्रावणी चांदगुडे तिरसे तृप्ती,गावंड धनश्री आदी विद्यार्थी शिक्षक दिनी शिक्षक बनले होते.
सदर प्रसंगी प्राचार्य बारे यांनी सांगितले की,”आजच्या काळातील विद्यार्थ्यांची शिस्त ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे,त्यामुळे भविष्याची पावलं ओळखून विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त बाळगावी आणि गुरुदक्षिणा म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त करावे असे आवाहन उपस्थितांना केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य ढेकळे यांनी केले आहे.तर सूत्रांचालन सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी चांदगुडे व प्रणाली चांदगुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ईश्वरी गाढे या विद्यार्थिनीने मानले आहे.