विशेष दिन
माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेणार-प्रांताधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशासाठी समर्पण भावनेने काम केलेल्या सैनिकांच्या प्रश्नांविषयी शासन सकारात्मक आहे.सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिबीर घेण्यात येईल असे आश्वासन शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
कारगिल दिनानिमित्त शारदा संगीत विद्यालयाचे केतन कुलकर्णी,दिपाली कुलकर्णी व त्यांचे सहकारी बालकलाकारयांनी देशभक्तीपर गिते सादर केली.श्री.गो.विद्यालयाच्या विद्यार्थींनी ‘संदेसे आते है’ या गीतावर समुह नृत्य सादरीकरण केले.एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट वैष्णवी गंडे आणि सहकारी मुलींनी समुह गीत सादर केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो,अ.नगर आणि सूर्यतेज संस्था,कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी सैनिक आर.बी.तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान,कोपरगांव व माजी सैनिक कोपरगांव यांचे सहकार्यातून कोपरगाव येथे २६ जुलै २०२३ रोजी कोपरगावातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे ‘कारगिल विजय दिवसा’निमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी प्रसंगी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,पोलीस उप अधीक्षक संदिप मिटके,प्रभारी तहसीलदार विकास गंबरे,कोपरगांवचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,कारगिल युध्दात सहभागी सुभेदार यमाजी चेडे,सुभेदार राजेश धुमाळ,नायक सुभाष खिलारे,हवालदार बाळू तुजारे,हवालदार बाळासाहेब ढवळे,हवालदार देविदास गवांदे,गहिनीनाथ पोकळे,शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,प्रभारी क्षेत्रिय प्रचार अधिकारी पी.फणिकुमार,शिर्डी माहिती अधिकारी सुरेश पाटील,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,आत्मा मालिक क्रीडा व शैक्षणिक संकुलाचे हेमाकांत पाटील,श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,एक्स सर्व्हिसमन असोसिएशनचे युवराज गांगवे,मारुती कोपरे,भाऊसाहेब निंबाळकर,संदिप चोळके आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगाव व राहाता परिसरातील माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथे शिबीर आयोजित करण्यात येईल.या शिबिराच्या माध्यमातून समस्या सोडविण्यात येतील.
प्रारंभी भारतमाता प्रतिमा पूजन आणि अमर जवान स्मृती प्रतिकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सहभागी झालेल्या वीर जवान यांचे स्नेहवस्र,सन्मानपत्र आणि झाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला आहे.
या प्रसंगी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले सुभेदार यमाजी चेडे यांनी कारगिल युद्धातील अनुभव आणि प्रसंगाचे वर्णन केले आहे.
कारगिल दिवस या विषयावर चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कारगिल युध्दाचे प्रसंग वर्णन असणारी चलचित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
उपस्थितांचे स्वागत प्रभारी क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी.फणिकुमार यांनी तर सूत्रसंचालन वासंती गोंजारे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी मानले आहे.